VIDEO : तरूणाने होस्टेलमध्ये अशा ठिकाणी लपवले फिल्टर, ज्याचा कुणी विचारही केला नसेल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 15:25 IST2024-10-30T15:24:35+5:302024-10-30T15:25:22+5:30
Viral Video : तरूणाने सिगारेट ओढून फिल्टर अशा ठिकाणी लपवले होते, ज्याची कुणी कल्पनाही केली नसेल. या ठिकाणाहून एक-दोन नाही तर हजारो फिल्टर बाहेर काढण्यात आले.

VIDEO : तरूणाने होस्टेलमध्ये अशा ठिकाणी लपवले फिल्टर, ज्याचा कुणी विचारही केला नसेल!
Viral Video : मुलांच्या होस्टेलमधील दृश्य कसं असतं हे होस्टेलमध्ये राहिलेल्या मुलांना चांगलंच माहीत असतं. सध्या मुलांच्या होस्टेलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. होस्टेलच्या एका रूममध्ये हजारो सिगारेटचे फिल्टर शोधून काढले जात आहेत. तरूणाने सिगारेट ओढून फिल्टर अशा ठिकाणी लपवले होते, ज्याची कुणी कल्पनाही केली नसेल. या ठिकाणाहून एक-दोन नाही तर हजारो फिल्टर बाहेर काढण्यात आले.
व्हिडीओत एका तरूणीच्या बेडच्या फुटिंगमधून सिगारेटचे शेकडो फिल्टर काढताना दाखवण्यात आलं आहे. तसेच सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली की, फुटिंगच्या आत सिगारेटचे फिल्टर कसे ठेवले. होस्टेलमध्ये राहताना मुलांच्या जीवनात असे अनेक किस्से होत असतात ज्यांचा लोकांनी कधी विचारही केला नसतो.
हाही होस्टेल लाइफचा असाच एक किस्सा आहे. या व्हिडिओतून हे स्पष्ट झालं की, होस्टेलमध्ये राहणारे तरूण आपले शौक पूर्ण करण्यासाठी आणि लोकांपासून लपवण्यासाठी कशाप्रकारे जुगाड करत असतात.
व्हिडिओत बघू शकता की, एक तरूण त्याच्या मित्राच्या रूममध्ये जातो आणि बेड वर उचलतो. त्यानंतर रॉडने फुटिंगवर मारतो तेव्हा सिगारेटचे शेकडो फिल्टर बाहेर निघतात.
हा व्हिडीओ @ghantaa नावाच्या इन्स्टा अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. याच्या कॅप्शनला लिहिलं आहे की, 'जस्ट बॉईज थिंग्स'. आतापर्यंत या व्हिडिओला ५ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही देत आहेत.