VIDEO : भर रस्त्यात तरूणाने केला तरूणीला प्रपोज, बघा पुढे काय झालं ते....

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 18:01 IST2022-02-08T17:57:59+5:302022-02-08T18:01:06+5:30

Valentine Week : आता व्हॅलेंटाईन वीकची सुरूवात झाली असून सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. असाच एक व्हिडीओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

Boy proposed a girl on road on rose day, video goes viral | VIDEO : भर रस्त्यात तरूणाने केला तरूणीला प्रपोज, बघा पुढे काय झालं ते....

VIDEO : भर रस्त्यात तरूणाने केला तरूणीला प्रपोज, बघा पुढे काय झालं ते....

व्हॅलेंटाईन वीकची सुरूवात झाली आहे. तरूणाईच्या अंगातील रोमिओ-ज्यूलिएट आणि हीर-रांझा जागे होत आहेत. कपल आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करत आहेत. अनेकदा त्यांच्या या पद्धती पाहून हैराण व्हायला होतं. तर काही व्हिडीओ बघायला मजा येते. आता व्हॅलेंटाईन वीकची सुरूवात झाली असून सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल Viral Video) होत आहेत. असाच एक व्हिडीओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, हे एक प्रपोजल आहे. पण रोज डे चा हा व्हिडीओ पाहून तुम्ही तुमच्या हसण्यावर कंट्रोल करू शकणार नाहीत. तुम्ही बघू शकता की, एक तरूण शाळेत जाणाऱ्या मुलीला मधेच थांबवतो आणि प्रेमाने तिला गुलाबाचं फूल देतो. पण मुलगी लाजून पुढे जाते. मात्र, ती पुन्हा मागे येते आणि तरूणाजवळ जाते. तो तिला फूल देण्यासाठी गुडघ्यांवर बसतो. अखेर मुलगी त्याच्या हातून गुलाब घेते.

यानंतर तरूण आनंदाने नाचू लागतो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर लोक एकमेकांना शेअर करत आहेत. हा व्हिडीओ बघणारे अनेक लोक आपल्या शाळा-कॉलेजमधील लव्हस्टोरीजना जोडून बघत आहेत. लोकांनी कमेंट बॉक्समध्ये एकापेक्षा एक इमोशनल आणि आठवणींना उजाळा देणाऱ्या कमेंट्स केल्या आहेत.  
 

Web Title: Boy proposed a girl on road on rose day, video goes viral