शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video: सापासोबत खेळण्यासारखा खेळत होता मुलगा, दुसऱ्याच क्षणी खेळ आला अंगाशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2022 19:26 IST

एक व्हिडीओ समोर आला आहे. पण सापासोबत हा खेळ या मुलाच्या अंगाशी आला आहे. धडकी भरवणारा असा हा व्हिडीओ आहे.

 साप दिसला की अनेकांना दरदरून घाम फुटतो. पण काही लोक असे असताना ज्यांना सापासोबत खेळायला आवडतं. सापाचे असे बरेच व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. मोठी माणसंच नव्हे तर अगदी लहान मुलंही अवाढव्य सापांसोबत बिनधास्तपणे खेळताना दिसतात. असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. पण सापासोबत हा खेळ या मुलाच्या अंगाशी आला आहे. धडकी भरवणारा असा हा व्हिडीओ आहे (Snake attack video viral).

सापासमोर उभं राहण्याचीही कुणाची हिंमत होणार नाही. पण एका मुलाने सापाला हातात घेऊन त्याच्यासोबत मस्ती करण्याचा प्रयत्न केलं. त्याने सापाला आपल्या हातात धरून तोंडाजवळ नेलं. पण शेवटी साप तो साप. त्याने आपला डाव साधलाच. व्हिडीओ पाहून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.

व्हिडीओत पाहू शकता एक मुलगा दिसतो आहे. तसं त्याचं वय जास्त नसावं. त्याने आपल्या हातात एक भलामोठा साप धरला आहे. सापाचा आकार पाहूनच आपल्या तोंडचं पाणी पळतं. इतका मोठा साप या मुलाने आपल्या हातात धरला आहे. इतकंच नव्हे तर तो त्या सापाला आपल्या तोंडावरून फिरवतो आहे.

साप सुरुवातीला शांत दिसतो आहे. पण जेव्हा मुलगा कॅमेऱ्याकडे बघतो तेव्हा साप त्याच्यावर खतरनाक हल्ला करतो. साप त्या मुलाच्या डोक्यावर चावण्याचा प्रयत्न करतो. मुलासोबतही हे अचानक घडतं त्यामुळे तोही घाबरलेला दिसतो आणि मोठ्याने ओरडतो. तेव्हाच आपल्या काळजाचा ठोका चुकतो.

सापाने मुलाचे केस आपल्या तोंडात धरले आहेत. मुलगा सापाच्या तावडीतून सुटण्यासाठी धडपड करतो आहे. पण सापाने त्याच्या केसांना इतक्या घट्ट पकडलं आहे की त्याची सुटका अशक्य दिसते आहे. @tyrese इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. पुढे या मुलासोबत काय झालं माहिती नाही. सुदैवाने तो नीट असावा.  पण साप किंवा अशा कोणत्याही भयानक प्राण्यासोबत असा जीवघेणा खेळ खेळण्याचा किंवा मस्ती करण्याचा प्रयत्न करू नका.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाsnakeसापInstagramइन्स्टाग्राम