तंबाखू डान्स! नागिण डान्स, डिस्को डान्स तुम्ही खूप पाहिले असतील, तरूणाचा हा यूनिक डान्स बघून व्हाल अवाक्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2022 16:41 IST2022-12-31T16:14:47+5:302022-12-31T16:41:12+5:30
Viral Video : हा व्हिडीओ एका यूजरने इन्स्टावर शेअर केला आहे. आधी तर हा व्हिडीओ फार गाजला नाही. पण व्हिडीओ फेमस झाल्यावर याला गुटखा डान्स असं नाव देण्यात आलं आहे.

तंबाखू डान्स! नागिण डान्स, डिस्को डान्स तुम्ही खूप पाहिले असतील, तरूणाचा हा यूनिक डान्स बघून व्हाल अवाक्...
Boy Dancing After Eating Khaini : डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच धुमाकूळ घालत असतात. पण अनेकदा डान्सच्या अशा काही स्टेप्स बघायला मिळतात की, हसून हसून पोट दुखू लागतं. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून लोक एन्जॉय करत आहेत. हा व्हिडीओ गुटखा डान्स नावाने व्हायरल झालाय, पण मुळात एक तरूण तंबाखू घोटता घोटता डान्स करत आहे.
हा व्हिडीओ एका यूजरने इन्स्टावर शेअर केला आहे. आधी तर हा व्हिडीओ फार गाजला नाही. पण व्हिडीओ फेमस झाल्यावर याला गुटखा डान्स असं नाव देण्यात आलं आहे. व्हिडीओत बघू शकता की, बरेच लोक स्टेजच्या खाली आणि वर तूफान डान्स करत आहेत.
यादरम्यान एक तरूण कॅमेरासमोर काहीतरी करताना दिसत आहे. लोकांनी बारकाईने पाहिलं तर हा तरूणी तंबाखू मळताना दिसत आहे. हे करत असताना तो डान्सही करत आहे. त्यानंतर तो तंबाखू खातो आणि सगळ्यांमध्ये डान्स करायला जातो. यात आम्ही तंबाखू खाण्याचं अजिबात समर्थन करत नाही. फक्त तरूणाच्या स्टाईलमुळे आणि हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने दाखवत आहोत.