पाण्यात शुज भिजू नयेत म्हणून नोकराला करायला लावले 'असे' काम, पण नंतर आपटला तोंडावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2021 14:03 IST2021-08-06T14:02:29+5:302021-08-06T14:03:09+5:30

या व्हिडिओमधील व्यक्तीला पाहुन तुम्ही हसणं रोखुच शकणार नाही. आपल्या नोकराला त्याने असं काही वागवलंय की त्याची त्याला चांगलीच शिक्षा मिळालीये.

boss don't want to wet his shoes, see funny viral video | पाण्यात शुज भिजू नयेत म्हणून नोकराला करायला लावले 'असे' काम, पण नंतर आपटला तोंडावर

पाण्यात शुज भिजू नयेत म्हणून नोकराला करायला लावले 'असे' काम, पण नंतर आपटला तोंडावर

कोणावर हसू नये असं म्हणतात कारण तशी वेळ आपल्यावरही येऊ शकते. पण या व्हिडिओमधील व्यक्तीला पाहुन तुम्ही हसणं रोखुच शकणार नाही. आपल्या नोकराला त्याने असं काही वागवलंय की त्याची त्याला चांगलीच शिक्षा मिळालीये.

या व्हिडिओमधील मालकाला म्हणजेच बॉसला आपले किमती शुज भिजवायचे नव्हते. आपण पाहु शकता की पाऊस पडतोय. रस्त्यावरून पाणी वाहतंय. इतक्यात एक नोकर त्याच रस्त्यावरील पाण्यातून येतो आणि आपल्या मालकासाठी लाकडाचा छोटा ब्रीज त्याच्या समोर ठेवतो. जेणेकरून त्याचा बॉस त्या वाकडी ब्रीजवर पाय ठेऊन येईल आणि त्याच्या पायांना, खरंतर त्याच्या महागड्या शुजला पाणी लागणार नाही. पण नियती कशी गंमत करते पाहा. तो बॉस त्या लाकडावर असा काही घसरतो की धापकन पाण्यात पडतो. त्यात तो तर पूर्ण ओला होतोच पण ज्या शुजना तो इतकं सांभाळत असतो तेही ओले होतात.

ट्वीटरवर हा व्हिडिओ instant regret या अकांऊटवरून शेअर करण्यात आला आहे. सर्वजण त्या बॉसवर पोट धरुन हसतायत. नेटकरी त्या बॉसची आपल्या कमेंटमधून चांगलीच मजा उडवत आहेत.

Web Title: boss don't want to wet his shoes, see funny viral video