अब्जाधीश इलॉन मस्क यांनी लपवून ठेवले बारावे मूल, म्हणाले... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2024 09:19 IST2024-06-26T09:18:01+5:302024-06-26T09:19:05+5:30

इलॉन मस्क हे १२ व्या मुलाचे बाबा झाल्यापासून पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

Billionaire Elon Musk hides twelfth child | अब्जाधीश इलॉन मस्क यांनी लपवून ठेवले बारावे मूल, म्हणाले... 

अब्जाधीश इलॉन मस्क यांनी लपवून ठेवले बारावे मूल, म्हणाले... 

जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले इलॉन मस्क हे १२ व्या मुलाचे बाबा झाल्यापासून पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी या मुलाचा जन्म झाल्याचे गेल्या काही महिन्यांपासून लपवून ठेवल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र, मस्क यांनी हे आरोप फेटाळले असून, आपल्या मित्रांना आणि कुटुंबीयांना याविषयी माहिती असल्याचे त्यांनी म्हटले आहे. न्यूरालिंक या ब्रेन ट्रान्स्प्लांट कंपनीच्या कार्याधिकारी असलेल्या शिवोन झिलीस आणि मस्क यांनी १२व्या मुलाला जन्म दिला आहे. शिवोन आणि मस्क यांचे हे तिसरे मूल आहे.

मस्क म्हणाले की, प्रसिद्धिपत्रक काढून मला आणि शिवोनीला मूल होणार असल्याची घोषणा करणे खूप विचित्र झाले असते. मी गुपचूपपणे बाप झालो असल्याच्या वावड्या खोट्या आहेत. आमच्या कुटुंबीयांना याची माहिती होती. मस्क यांनी अद्याप नवीन मुलाचे नाव आणि लिंग उघड केलेले नाही. मस्क यांनी जगभरात घटत असलेल्या जन्मदराबाबतही चिंता व्यक्त केली आहे. सध्या मुले जन्माला घालण्याचे प्रमाण २.१ असे असून, त्यामुळे जगात मुलांचे प्रमाण कमी होणार आहे. हा मोठा धोका आहे. मस्क यांनी मोठ्या कुटुंबांना पाठिंबा दिला आहे.

Web Title: Billionaire Elon Musk hides twelfth child