धक्कादायक! बॉयफ्रेंडला रोज १०० कॉल...; प्रेयसीला झाला प्रेमाचा दुर्मिळ आजार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2024 06:25 IST2024-04-25T06:24:57+5:302024-04-25T06:25:31+5:30

तिने रागाने घरातील वस्तू फेकण्यास सुरुवात केली. खिडकीतून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला.

Beloved girl suffering from love brain disorder in love with boyfriend | धक्कादायक! बॉयफ्रेंडला रोज १०० कॉल...; प्रेयसीला झाला प्रेमाचा दुर्मिळ आजार

धक्कादायक! बॉयफ्रेंडला रोज १०० कॉल...; प्रेयसीला झाला प्रेमाचा दुर्मिळ आजार

कोणत्याही गोष्टीचा अतिरेक धोकादायक असतो, प्रेमाच्या बाबतीतही असेच आहे. चीनमधील १८ वर्षीय जियाओयू या मुलीला तिच्या प्रियकराचे असेच व्यसन लागले, पण यामुळे ती आजाराला बळी पडली.

तिने प्रियकराला फोन केला, मात्र तो कामात असल्याने फोन उचलू शकला नाही, त्यामुळे तरुणी त्याला कॉलवर कॉल आणि मेसेज करत राहिली. तिने सुमारे १०० कॉल केले. त्यानंतर तिने रागाने घरातील वस्तू फेकण्यास सुरुवात केली. खिडकीतून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. यानंतर कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात दाखल केले. ही मुलगी लव्ह ब्रेन डिसऑर्डरने ग्रस्त होती, असे डॉक्टरांनी सांगितले.

Web Title: Beloved girl suffering from love brain disorder in love with boyfriend