VIDEO : जंगलात फिरत असलेल्या अस्वलाने स्वत:ला आरशात पाहिलं आणि मग....
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2023 18:25 IST2023-09-04T18:23:13+5:302023-09-04T18:25:13+5:30
Viral Video : जंगलात प्रयोग म्हणून कुणीतरी आरसा लावला. ज्यात अस्वलाने स्वत:ला पाहिलं. त्यानंतर जे झालं ते बघून लोक पोटधरून हसत आहेत.

VIDEO : जंगलात फिरत असलेल्या अस्वलाने स्वत:ला आरशात पाहिलं आणि मग....
Bear Viral Video : मनुष्य तर रोज स्वत:ला आरशात बघतात आणि तयार होतात. पण तुम्ही कधी विचार केलाय का की, एखाद्या प्राण्याने स्वत:ला आरशात बघितल्यावर काय होईल? माकडांना तर तुम्ही आरशात बघताना अनेकदा पाहिलं असेल. त्यांना याची फार गंमतही वाटते. पण सध्या सोशल मीडियावर एका अस्वलाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जंगलात प्रयोग म्हणून कुणीतरी आरसा लावला. ज्यात अस्वलाने स्वत:ला पाहिलं. त्यानंतर जे झालं ते बघून लोक पोटधरून हसत आहेत.
हा क्षण टिपण्यासाठी काही अंतरावर कॅमेरा लावण्यात आला होता. जेव्हा अस्वल अचानक आरशासमोर आलं तेव्हा जे झालं ते बघण्यासारखं होतं. अस्वल स्वत:ला आरशात बघून घाबरलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्याद्वारे हे दाखवण्यात आलं की, एखादा प्राणी जेव्हा आरशासमोर येतो तेव्हा काय होऊ शकतं.
How a bear reacts to a mirror in the forest. pic.twitter.com/FS780FLqKr
— Fascinating (@fasc1nate) September 2, 2023
यात तेच झालं. अस्वल स्वत:ला आरशात बघून खूप घाबरलं. आधी तर अस्वल पळालं. पण नंतर त्याने आरशावर हल्ला केला. मग काय आरशा फुटला. लोक या व्हिडिओवर वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत.