Barber repeatedly straying water: बोंबला! केसातून पाणी गळेपर्यंत न्हाव्यानं स्प्रे मारला; अन् रागाच्या भरात पठ्ठ्यानं केलं असं काही......
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2021 13:27 IST2021-03-12T13:25:38+5:302021-03-12T13:27:07+5:30
Trending Viral News in Marathi : दोन ते तीनवेळा स्प्रे केल्यानंतर न्हावी केस विंचरायला सुरूवात करतो. पण काही न्हावी असे असतात जे केसांतून पाणी गळेपर्यंत स्प्रे करतच राहतात. सोशल मीडियावर एक असाच व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Barber repeatedly straying water: बोंबला! केसातून पाणी गळेपर्यंत न्हाव्यानं स्प्रे मारला; अन् रागाच्या भरात पठ्ठ्यानं केलं असं काही......
सोशल मीडियावर (Social Media) सध्या एका सलूनचा (Saloon) व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही लोटपोट होऊन हसाल. तुम्ही नेहमी पाहिलं असेल केस कापण्याआधी नेहमीच केस कापणारा माणूस पाण्याच्या स्प्रेनं केसांना ओलं करतो. दोन ते तीनवेळा स्प्रे केल्यानंतर न्हावी केस विंचरायला सुरूवात करतो. पण काही न्हावी असे असतात जे केसांतून पाणी गळेपर्यंत स्प्रे करतच राहतात. सोशल मीडियावर एक असाच व्हिडीओ व्हायरल होत आहे.
क्या आपने भी ऐसा महसूस किया है.😅 pic.twitter.com/tfDy8VipuZ
— Awanish Sharan (@AwanishSharan) March 11, 2021
केस कापणाऱ्या व्यक्तीनं एका ग्राहकांच्या केसांवर जरा जास्तचं पाणी मारलं (Barber Repeatedly Straying Water On Customer) आणि याचाच राग आल्यामुळे ग्राहकानं एक वेगळीच करामत केली आहे. रागाच्या भरात या माणसानं पाण्याचा अख्खा मग आपल्या डोक्यावर उलटा केला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ आयएएस अधिकारी अवनीश शरण (IAS Officer Awanish Sharan) यांनी शेअर केला आहे. या व्हिडीओसह त्यांनी गमतीदार कॅप्शनसुद्धा या व्हिडीओला दिलं आहे. आग लागलेल्या जंगलात अचानक बसरल्या पावसाच्या सरी; आनंदाच्या भरात महिला पोलिसानं धरला ठेका; पाहा व्हिडीओ
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता थोडावेळ केसांना स्प्रे केल्यानंतर पुन्हा न्हावी केसांवर पाणी मारतो. डोक्यावर येणारं पाणी पाहता ग्राहकानं चिडून पाण्याचा अख्खा मग आपल्या डोक्यावर ओतला आणि साबण लावताना दिसून येत आहे. अवनीश शरण यांनी व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, तुम्ही याचा कधी अनुभव घेतलाय का? काय सांगता? २९ हजार लिटर दारू उंदरांनी संपवली; पोलिसांचा दावा वाचून तुम्हीही व्हाल अवाक्....
हा व्हिडीओ आयपीएस अवनीश यांनी ११ मार्चला शेअर केला होता. आतापर्यंत १२ हजारांपेक्षा जास्त लोकांना हा व्हिडीओ पाहिला असून १७०० पेक्षा जास्त लाईक्स आणि २०० पेक्षा जास्त रिट्विट्स या व्हिडीओला मिळाले आहेत. हा व्हिडीओ लोकांना खूप मजेदार वाटत असून लोकांनी या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.