फुल पॅन्ट घालून ये, तरच 'एन्ट्री'...; शॉर्ट्स घालून आलेल्या ग्राहकाला बँकेत प्रवेश नाकारला!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 01:19 PM2024-04-15T13:19:27+5:302024-04-15T13:21:28+5:30

Bank Entry Video Viral  नागपूरमधील 'बँक ऑफ इंडिया'च्या बँक शाखेत घडला प्रकार

Bank of India Guard don not allow customer to enter bank because he was wearing half pant shorts video viral | फुल पॅन्ट घालून ये, तरच 'एन्ट्री'...; शॉर्ट्स घालून आलेल्या ग्राहकाला बँकेत प्रवेश नाकारला!

फुल पॅन्ट घालून ये, तरच 'एन्ट्री'...; शॉर्ट्स घालून आलेल्या ग्राहकाला बँकेत प्रवेश नाकारला!

Bank Entry Video Viral: ड्रेस कोड हा मुद्दा आला की त्यावरून वाद होणारच हे गेल्या काही वर्षांतील समीकरण बनले आहे. गेल्या काही वर्षांत ड्रेसकोडच्या मुद्द्यावरून कधी धार्मिक स्थळांचे प्रशासन तर कधी कॉलेजेस टीकेचे धनी बनले. भारत स्वतंत्र होऊन अनेक वर्षे झाली, त्यामुळे या देशात कोणी कसे कपडे घालावेत याचा प्रत्येकाला अधिकार आहे असे अनेकदा युक्तिवादही केला जातो. पण ड्रेस कोडच्या नावाखाली तुम्हाला एखाद्या बँकेत जाण्यापासून रोखण्यात आले तर... असा एक प्रकार नुकताच घडला आहे. बँक ऑफ इंडियाच्या नागपूर शाखेत अशी एक घटना घडली असून हा प्रकार सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.

बँकेचा एक ग्राहक थ्री-फोर्थ (३/४) पॅन्ट घालून बँकेत आल्याने त्याला प्रवेश नाकारण्यात आल्याची घटना घडली. एका व्हिडिओमध्ये तो ग्राहक सुरक्षारक्षकाशी वाद घालत असल्याचे दिसत आहे. केवळ कपड्यांमुळे बँकेत प्रवेश दिला जात नसल्याचे तो गार्डला सांगत असल्याचे समजते. पण त्यावर गार्ड फार काही बोलायला तयार होत नाही.

नागपुरात एक ग्राहक बँक ऑफ इंडियाच्या शाखेत काही पैशांचा व्यवहार करण्यासाठी आला होता. तो आत जाऊ लागला, मात्र तेथील सुरक्षा रक्षकाने त्याला अडवले. गार्डने सांगितले की, बँकेच्या नियमानुसार आत येण्यासाठी पूर्ण पँट घालावी लागते. हे ऐकून तो माणूस आश्चर्यचकित आणि संतापला. त्यांनी सांगितले की, त्यांनी यापूर्वी कोणत्याही बँकेत असे नियम पाहिले नव्हते. त्याला याबाबत काहीच माहिती नव्हती. गार्डचे म्हणणे आहे की, त्या व्यक्तीने पँटऐवजी शॉर्ट्स घातल्यामुळे त्याला बँकेत प्रवेश करण्यापासून रोखण्यात आले आहे. व्हिडिओमध्ये, ग्राहक बँकेत येणाऱ्या ग्राहकांसाठी ड्रेस कोड आहे का, असे विचारताना ऐकू येत आहे, परंतु गार्ड या प्रश्नाचे उत्तर देत नाही. व्हिडिओमध्ये, तो माणूस विचारतो की बँकेत येणाऱ्या लोकांसाठी कपड्यांचे नियम का असावेत, परंतु गार्ड थेट उत्तर देत नाही.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी लोकांच्या कपड्यांवरून बंधने घालायची का, असा वाद सुरू झाला आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच सोशल मीडियावर लोकांनी संताप व्यक्त केला आहे. कपड्यांच्या आधारावर बँक भेदभाव करत असल्याचे लोकांना वाटताना दिसते. अनेकांनी व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना लिहिले की असे नियम भेदभाव करणारे आणि चुकीचे आहेत, तर काही लोकांनी सांगितले की ग्राहकांसाठी कोणताही अधिकृत ड्रेस कोड नाही.

Web Title: Bank of India Guard don not allow customer to enter bank because he was wearing half pant shorts video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.