शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

निशब्द! जन्मताच आईनं सोडलं, खेळण्यातील बाहुलीत 'त्यानं' माया शोधली; डोळ्यात पाणी आणणारा Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2026 09:59 IST

पंच मोठा झाला तसं त्याने त्याच्या आईकडे आणि इतर माकडांकडे जाण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रत्येकवेळी त्याला झिडकारण्यात आले

आईपासून मुलं कधीही वेगळी होऊ शकत नाहीत. मग मुले कितीही मोठी असली आणि आईपासून कितीही लांब राहत असली तरी आईच्या प्रेमापासून ती दूर जात नाहीत. मुलं आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांच्या आईच्या मायेला शोधत असतात. आईच्या कुशीत मिळालेली ऊब कायम आठवणीत राहते. या सगळ्या भावना माणसांमध्येच असतात असं नाही. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहणाऱ्यांचे डोळे नकळत पाण्याने ओले होत आहेत. ही कहाणी आहे बेबी मंकीची...

बॉलीवूड सिनेमातील एक फेमस डायलॉग सगळ्यांना आठवत असेल, मेरे पास माँ है...जगातील सर्व सुख एकीकडे आणि आईचं आपल्या आयुष्यात असणं हेच सगळ्यांवर भारी पडते. जपानमधील बेबी मंकीच्या व्हायरल व्हिडिओने सोशल मीडियात अनेकांना भावूक केले आहे. जपानच्या इचिकावा शहरातील प्राणी संग्रहालयातील हा व्हिडिओ आहे. २६ जुलै २०२५ रोजी याठिकाणी जन्मलेला एका चिमुकला माकड सध्या जगात ट्रेंडमध्ये आहे. या बेबी मंकीने जन्म घेताच त्याच्या आईने त्याला दूर केले. तेव्हापासून या माकडाचा प्रवास एकटेपणात सुरू झाला. प्राणी संग्रहालयातील कर्मचाऱ्यांनी त्याचा सांभाळ केला. त्याला खायला प्यायला दिले आणि प्रेमाने त्याचे नाव पंच ठेवले.

पंच मोठा झाला तसं त्याने त्याच्या आईकडे आणि इतर माकडांकडे जाण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रत्येकवेळी त्याला झिडकारण्यात आले. इतर माकडांपासून तो घाबरून पळू लागला. पंचचा एकटेपणा दूर करण्यासाठी प्राणी संग्रहालयातील कर्मचाऱ्याने त्याला खेळण्यातील माकड आणून दिले. पंचसाठी हे खेळणे नव्हते तर त्यात तो त्याची आई शोधू लागला. या खेळण्याने त्याला मायेची ऊब मिळत होती. या खेळण्यातून त्याला सुरक्षा मिळत होती. पंचचा हा व्हिडिओ एका कर्मचाऱ्याने शूट केला आणि सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केला. बेबी पंच त्याच्या सॉफ्ट टॉयला घेऊन मिठी मारत होता, त्याला आपल्यासोबत घेऊन जात होता. हा व्हिडिओ पाहून आईच्या प्रेमासाठी तरसणाऱ्या बेबी पंचची कहाणी व्हायरल झाली.

या व्हिडिओतून लोक पंचमधील एकटेपणा, बालपण आणि आपल्या गरजा पाहू लागले. काही जण या माकडाला आपल्यासोबत घेण्याची इच्छा व्यक्त करू लागले. सोशल मीडियात पंचचे फोटो आणि व्हिडिओ ट्रेंडिंगमध्ये आहेत. जपानी माकडे कायम टोळीत राहतात. जेव्हा पंचचा जन्म झाला तेव्हा त्याचे वजन ५०० ग्राम होते. भीषण गरमीमुळे प्रसुती वेदनेने थकलेल्या आईने त्याच्याकडे फार लक्ष दिले नाही. समुहातील इतर मादी माकडांनीही पंचला जवळ केले नाही. त्यामुळे जन्माच्या दुसऱ्या दिवशीपासून प्राणी संग्रहालयातील कर्मचाऱ्यांनी त्याला बॉटलने दूध पाजणे सुरू केले. कर्मचाऱ्यांनी पंचसमोर चादर आणि खेळणी ठेवली. त्यातील ओरांगुटान टॉय पंचला खूप आवडला. हा टॉय पंचच्या आयुष्यातील त्याची आई बनली.  

English
हिंदी सारांश
Web Title : Abandoned baby monkey finds solace in toy after mother's rejection.

Web Summary : A baby monkey, rejected by its mother at birth, found comfort in a toy orangutan at a Japanese zoo. Zookeepers cared for 'Punch,' offering the toy for companionship after failed attempts to integrate him with other monkeys. The touching video of Punch hugging his toy has gone viral.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलMonkeyमाकडSocial Mediaसोशल मीडिया