सोशल मीडियावर सध्या 'पंच'चे नवीन फोटो आणि व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहेत. एकेकाळी एकटेपणामुळे एका सॉफ्ट टॉयला बिलगून राहणारा हा पंच आता आपल्या नवीन जोडीदारासोबत खेळताना आणि बागडताना दिसत आहे. पंचला नवीन गर्लफ्रेंड मिळाली आहे.
जपानमधील 'इचिकावा सिटी झू'मध्ये राहणारा पंच यापूर्वीही चर्चेत आला होता. त्यावेळी त्याचे काही फोटो समोर आले होते, ज्यामध्ये तो एका सॉफ्ट टॉय माकडाला घट्ट पकडून बसलेला दिसायचा. त्याचे ते फोटो पाहून जगभरातील लोकांचे डोळे पाणावले होते.
आता समोर आलेल्या रिपोर्टनुसार, पंचला एक नवीन जोडीदार मिळाली आहे, जिचं नाव 'मोमो-चान' असल्याचं सांगण्यात येत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये दोघेही एकत्र उड्या मारताना, एकमेकांसोबत खेळताना दिसत आहेत. काही क्षणांमध्ये त्यांच्यातील आपुलकी आणि प्रेम स्पष्टपणे जाणवतं.
या व्हिडिओचं खास वैशिष्ट्य म्हणजे, पंचचं ते जुनं सॉफ्ट टॉय अजूनही तिथे दिसतं, जे एकेकाळी त्याची ओळख बनलं होतं. हे खेळणं त्याच्या आयुष्यातील त्या काळाची आठवण करून देतं, जेव्हा तो पूर्णपणे एकटा होता.
पंचची गोष्ट खूपच भावूक आहे. जन्मानंतर त्याच्या आईने त्याला सोडून दिलं होतं. अशा परिस्थितीत प्राणीसंग्रहालयाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला एक सॉफ्ट टॉय दिलं, जेणेकरून तो त्याला बिलगून राहू शकेल. माकडांच्या पिल्लांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची सवय असते, ज्यामुळे त्यांच्यामध्ये सुरक्षिततेची भावना आणि आत्मविश्वास निर्माण होतो.
प्राणीसंग्रहालय प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, ते सॉफ्ट टॉय पंचसाठी फक्त खेळण्याची वस्तू नव्हती, तर तो त्याच्यासाठी एक मोठा आधार होता. ज्याने त्याला नवीन वातावरणात जुळवून घेण्यास मदत केली. काळाप्रमाणे पंचने स्वतःला सावरलं आहे आणि आता तो पूर्वीपेक्षा अधिक आनंदी दिसत आहे.
मोमो-चान त्याच्या आयुष्यात आल्याने एक नवीन वळण आलं आहे. या दोघांची मैत्री आणि एकत्र घालवलेले क्षण लोकांना खूप आवडत आहेत. पंचची ही गोष्ट केवळ एक व्हायरल व्हिडीओ नसून एक असा प्रवास आहे जो दाखवतो की, परिस्थिती कितीही कठीण असली, तरी काळानुसार आयुष्यात पुन्हा आनंद नक्कीच परततो.
Web Summary : Baby monkey Punch, once clinging to a toy due to loneliness, now has a girlfriend, Momo-chan. The pair are seen playing together in a viral video from a Japanese zoo. Punch's old toy remains, a reminder of his past.
Web Summary : कभी अकेलेपन से जूझ रहा बेबी मंकी 'पंच' को मिली गर्लफ्रेंड 'मोमो-चान'। जापानी चिड़ियाघर से वायरल वीडियो में दोनों साथ खेलते दिख रहे हैं। पंच का पुराना खिलौना उसकी पिछली यादों को ताज़ा करता है।