हेल्मेटमध्ये लपला किंग कोब्रा, बाईक चालकाच्या डोक्याला घेतला चावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 18:20 IST2024-12-27T18:19:37+5:302024-12-27T18:20:19+5:30

Baby King Cobra In Helmet: या घटनेचा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे.

Baby King Cobra In Helmet: King Cobra hid in helmet, bit a biker on the head | हेल्मेटमध्ये लपला किंग कोब्रा, बाईक चालकाच्या डोक्याला घेतला चावा

हेल्मेटमध्ये लपला किंग कोब्रा, बाईक चालकाच्या डोक्याला घेतला चावा


Baby King Cobra Bite Biker Video:सोशल मीडियावर दररोज विविध प्रकारचे व्हिडिओ अन् फोटो व्हायरल होतात. आता दक्षिण भारतातील एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक लहान किंग कोब्रा साप हेल्मेटमध्ये लपलेल्याचे दिसतोय. सर्पमित्राने हेल्मेटमध्ये काठी टाकताच कोब्राचे पिल्लू आपला फणा काढून हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. विशेष म्हणजे, या सापाने बाईक चालकाच्या डोक्याला दंश केल्याचा दावाही या व्हिडिओतून केला जातोय.

नुकत्याच व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दावा केला जातोय की, एका तरुणाने हेल्मेट घालण्याचा प्रयत्न केला असता, त्यात लपलेल्या कोब्राने त्याच्यावर हल्ला. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर मनोज शर्मा नावाच्या युजरने हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओसोबतच हेल्मेट घालताना तपासून घेण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

केरळमध्ये घडलेली अशी घटना
गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात केरळमध्येही एक घटना घडली होती. एका व्यक्तीने आपले हेल्मेट उचलले, तेव्हा त्याला आत काहीतरी विचित्र हालचाली दिसल्या. त्याने तातडीने वनविभागाशी संपर्क साधला आणि एक स्वयंसेवक घटनास्थळी पोहोचला. त्याने हेल्मेट उघडले असता त्यात कोब्रा साप लपलेला आढळला. हा साप लहान असला तरी त्याचे विष अतिशय घातक होते.
 

Web Title: Baby King Cobra In Helmet: King Cobra hid in helmet, bit a biker on the head

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.