शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
4
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
5
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
6
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
7
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
8
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
9
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
10
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
11
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
12
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
13
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
14
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
15
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
16
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
17
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
18
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
19
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
20
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ

'आधार कार्ड'वर नावाऐवजी लिहिलं 'मधु का पांचवां बच्चा', पाहून शिक्षकही आश्चर्यचकित!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 14:31 IST

Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशातील बदायूं येथे राहणारे दिनेश आणि मधु हे त्यांच्या मुलीला प्राथमिक शाळेत दाखल करण्यासाठीआले होते. प्रवेशावेळी शिक्षकांनी आधारकार्ड मागितले. आधार कार्डवर मुलीच्या नावाऐवजी 'मधूचे पाचवे मूल' असे लिहिले होते.

उत्तर प्रदेशातील बदायूंमध्ये आधार कार्ड बनवताना असा निष्काळजीपणा समोर आला आहे, जो पाहून सगळेच हैराण झाले आहेत. आधार कार्ड बनवणारे लोक किती बेफिकीर आणि मनमानी कारभार करत आहेत, हे या प्रकरणातून दिसून येते. आधारकार्ड मिळाल्यानंतर दोन वर्षांनी पालक जेव्हा आपल्या पाल्याला दाखल करण्यासाठी शाळेत पोहोचले तेव्हा संपूर्ण प्रकरण उघडकीस आले.

त्याचे झाले असे की उत्तर प्रदेशातील बदायूंमधील तहसील भागातील बिलसी गावात एक व्यक्ती आपल्या मुलीला शाळेत प्रवेश घेण्यासाठी पोहोचला. पण प्राथमिक शाळेच्या शिक्षकांनी या व्यक्तीच्या मुलाला शाळेत प्रवेश देण्यास नकार दिला. कारण आधार कार्डवर त्याच्या मुलीचे नावच नव्हते. मुलाच्या नावाच्या जागी "मधु का पांचवां बच्चा" असे लिहिले होते. आधार कार्डवर असे नाव पाहिल्यानंतर शिक्षकांनी मुलाच्या वडिलांना ते दुरुस्त करण्यास सांगितले.

सोशल मीडियावर आधार कार्ड व्हायरल "मधु का पांचवां बच्चा" लिहिलेले आधार कार्ड सोशल मीडियावरही खूप व्हायरल होत आहे. बिलसी तहसील भागातील रायपूर गावात राहणाऱ्या दिनेशला ५ मुले आहेत. त्यांची तीन मुले गावातीलच प्राथमिक शाळेत शिकतात. मुलगी आरतीला प्रवेश घेण्यासाठी दिनेश शाळेत पोहोचला तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या शिक्षिका एकता वार्ष्णेय यांनी नावनोंदणीची सर्व औपचारिकता पूर्ण करून मुलीचे आधार कार्ड पाहून आश्चर्य व्यक्त केले. आधार कार्डमध्ये मुलीच्या नावाऐवजी "मधु का पांचवां बच्चा" असे लिहिले होते. यासोबतच आधार कार्डवर आधार क्रमांकाचाही उल्लेख नाही.

आरतीचे वडील दिनेश यांना आधार कार्डमध्ये नाव दुरुस्त केल्यानंतरच प्रवेश घेण्यास या शिक्षकाने सांगितले असून अशा चुकांकडे दुर्लक्ष करू नका, असे आवाहन त्यांनी केले आहे. त्या वेळेत दुरुस्त करा, असेही त्या म्हणाल्या.

निष्काळजीपणावर अधिकारी काय म्हणाले?आधारकार्डमध्ये अशाप्रकारे निष्काळजीपणाचे प्रकरण समोर आल्यानंतर बदायूँच्या जिल्हा दंडाधिकारी दीपा रंजन यांनी सांगितले की, बँक आणि पोस्ट ऑफिसमध्ये आधार कार्ड बनवले जात आहेत. ही बाब माझ्या निदर्शनास आलेली नाही. असे झाले असेल तर तो घोर निष्काळजीपणा आहे. बँक आणि पोस्ट ऑफिसच्या अधिकाऱ्यांना सतर्क केले जाईल आणि असा निष्काळजीपणा करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटके