मुलांची सतत फोन बघण्याची सवय सोडवण्यासाठी दाखवला जात आहे हा व्हिडीओ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2024 15:46 IST2024-03-12T15:46:02+5:302024-03-12T15:46:18+5:30
Awareness Raising Video: चीनमधील एका शाळेने एक अनोखा व्हिडीओ समोर आणला आहे. जो मुलांमध्ये फोनच्या खतरनाक प्रभावांबाबत जागरूकता वाढवण्याचं काम करतो.

मुलांची सतत फोन बघण्याची सवय सोडवण्यासाठी दाखवला जात आहे हा व्हिडीओ!
Awareness Raising Video: आजकाल सगळीकडे बघायला मिळतं की, लहान मुलांना मोबाइलचं फारच वेड लागलं आहे. खेळणं आणि अभ्यास सोडून ते मोबाइलवर व्हिडीओ-गेम्स बघत बसलेले असतात. खूप जास्त वेळ मोबाइल बघितल्याने त्यांच्या डोळ्यांवर आणि मेंदुवर परिणाम होतो. लहान मुलांना कितीही ओरडलं तरी ते काही मोबाइल सोडत नाहीत. त्यांची मोबाइलची सवय सोडवणं पालकांसाठी आव्हान ठरतं. अशात चीनमधील एका शाळेने एक अनोखा व्हिडीओ समोर आणला आहे. जो मुलांमध्ये फोनच्या खतरनाक प्रभावांबाबत जागरूकता वाढवण्याचं काम करतो.
चीनमधील हा व्हिडीओ त्या सर्व मुलांना दाखवला पाहिजे जे त्यांचा जास्तीत जास्त वेळ स्मार्टफोन बघण्यात घालवतात. हा व्हिडीओ बघून ते समजू शकतील की, त्यांची ही सवय त्यांचं भविष्य कसं बिघडवू शकते. यात सांगण्यात आलं आहे की, फोनच्या जास्त वापराने त्यांचं कसं आणि किती नुकसान होतं. व्हिडीओच्या सुरूवातीलाच क्लासमध्ये अनेक मुलं-मुली बसले आहेत. त्यांच्यासमोर एका स्क्रीनवर हा व्हिडीओ लावून त्यांना दाखवण्यात येत आहे.
Awareness-raising video shown in some Chinese schools…
— Tansu Yegen (@TansuYegen) March 8, 2024
pic.twitter.com/6c8z3S2oeS
व्हिडिओत एक मुलगी फोनचा वापर करताना दिसत आहे. अशात ना तिचं लक्ष जेवणाकडे आहे ना अभ्यासात आहे. जास्त फोन पाहिल्याने मुलीचे डोळेही खराब झाले आणि तिला चष्मा लागला. यानंतर तिच्याकडून मोबाइल हिसकावून घेतला जातो. त्यानंतर तिला जेही काम दिलं जातं त्या बदल्यात तिला फार कमी पैसे मिळतात. यानंतर व्हिडिओचा दुसरा भाग सुरू होतो. ज्यात मुलीला फोनचा वापर न करता अभ्यास करताना दाखवलंय. इतकंच नाही तर ती वेळेवर जेवतानाही दिसते. तिला डिग्रीही मिळते. त्यासोबतच तिला चांगल्या पगाराची नोकरीही लागते.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर हा व्हिडीओ @TansuYegen नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. 1 मिनिट 42 सेकंदाच्या या व्हिडिओला आतापर्यंत 2.4 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. तर 18 हजारांपेक्षा जास्त लोकांना व्हिडिओला लाइक केलं आहे. लोक यावर चांगल्या कमेंट्सही करत आहेत.