विराट कोहलीच्या रेस्टॉरंटमध्ये खाल्ला भुट्टा; बघा किती द्यावे लागले पैसे, तुम्हीही चक्रावून जाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 19:31 IST2025-01-14T19:30:01+5:302025-01-14T19:31:29+5:30
टीम इंडियाचा खेळाडू विराट कोहलीच्या रेस्टॉरंटमध्ये एका विद्यार्थिनीने मक्याचा भुट्टा खाल्ला. तिने फोटो शेअर करत किती पैसे द्यावे लागले याबद्दल पोस्ट केलीये.

विराट कोहलीच्या रेस्टॉरंटमध्ये खाल्ला भुट्टा; बघा किती द्यावे लागले पैसे, तुम्हीही चक्रावून जाल
क्रिकेटपटू विराट कोहलीच्या कमाईचे साधन केवळ क्रिकेट नाहीये. तर स्पॉन्सरशिप आणि इतर माध्यमातून तो पैसा कमावतो. विराट कोहलीची स्वतःचे रेस्टॉरंटही आहेत. One8 Commune नावाने असलेल्या रेस्टॉरंटचे वेगवेगळ्या शहरात आऊटलेट आहेत. याच रेस्टॉरंटबद्दल एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका विद्यार्थिनीने विराट कोहलीच्या या रेस्टॉरंटमध्ये कॉर्न स्टार्टर (मक्याचा भुट्टा) मागवले. त्यासाठी तिला ५२५ रुपये द्यावे लागले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
बिझनेस टुडेच्या रिपोर्टनुसार, विराट कोहलीच्या हैदराबादमधील रेस्टॉरंटबद्दल स्नेहा नावाच्या विद्यार्थिनीने पोस्ट केली आहे.
तिने दावा केला आहे की, कॉर्न स्टार्टरसाठी तिला ५२५ रुपये द्यावे लागले. स्नेहा कॉर्न स्टार्टर डिशचा फोटोही शेअर केला आहे. एका प्लेटमध्ये कापून ठेवलेला भुट्टा दिसत आहे. त्यावर कोथिबिंर आणि लिंबूने सजावट करण्यात आलेली आहे.
"मी One8 COmmune मध्ये यासाठी आज ५२५ रुपये दिले", असे तिने म्हटले आहे.
paid rs.525 for this today at one8 commune 😭 pic.twitter.com/EpDaVEIzln
— Sneha (@itspsneha) January 11, 2025
एका यूजरने यावर मिश्कील कमेंट केली आहे. त्याने म्हटले आहे की, १० रुपयाचे कणीस, १०० रुपयाची प्लेट, ५० रुपये टेबलसाठी, १०० रुपये खुर्चीसाठी, १५० रुपये एसीसाठी आणि ६५ रुपये टॅक्स असे सगळे जोडण्यात आले आहेत.
स्नेहाची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगली व्हायरल झाली आहे. आतापर्यंत या पोस्टला १२ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. काहींनी पोस्ट शेअरही केली आहे.