वाह रे वाह! नवरदेवाला लग्नात असं काही सजवलं, नवरदेव कमी पुष्पगुच्छच अधिक दिसतोय!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 12:01 IST2025-02-08T12:00:33+5:302025-02-08T12:01:06+5:30
Viral Video : नवरदेवाला हारानं पूर्णपणे झाकून देण्यात आलं. त्यामुळे तो नवरदेव कमी आणि पुष्पगुच्छच अधिक दिसतो आहे.

वाह रे वाह! नवरदेवाला लग्नात असं काही सजवलं, नवरदेव कमी पुष्पगुच्छच अधिक दिसतोय!
Viral Video : लग्नात नवरी-नवरदेवाला भरपूर सजवलं जातं. त्यांचे खास कपडे, दागिने, फेटा किंवा टोपी अशा अनेक गोष्टी लक्ष वेधून घेत असतात. लग्नाच्या दिवशी दोघेही एखाद्या राजा-राणीप्रमाणे भासतात. पण कधी कधी त्यांना असं काही सजवलं जातं की, ते गमतीचा विषय ठरतात. असंच काहीसं या नवरदेवासोबत झालंय. नवरदेवाला हारानं पूर्णपणे झाकून देण्यात आलं. त्यामुळे तो नवरदेव कमी आणि पुष्पगुच्छच अधिक दिसतो आहे. लोक या नवरदेवाला बघून पोटधरून हसत आहेत.
व्हिडिओत बघू शकता की, नवरदेव लग्नाच्या स्टेजवर उभा आहे. त्याचे नातेवाईक त्याच्यासोबत फोटो काढत आहेत. जसा कॅमेरा नवरदेवाकडे येतो, तेव्हा तुम्हीही हसू रोखू शकणार नाहीत. स्टेजवर उभ्या नवरदेवाच्या गळ्यात इतका मोठा हार टाकला की, तो पूर्णपणे त्यामागे झाकला गेलाय. नवरदेवाचा फक्त चेहराच दिसत आहे. हे दिसायला तर विचित्र वाटतच आहे, सोबतच नवरदेवालाही हाराचं ओझं झालं असेल.
हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @altu.faltu नावाच्या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला लाखो व्ह्यूज आणि लाइक्स मिळाले आहेत. तर नवरदेवाचा असा फोटो समोर येताच लोक त्याची खिल्लीही उडवत आहेत. व्हिडिओवर एका यूजरनं कमेंट करत लिहिलं की, हार काढण्यासाठी चार लोकांची गरज पडेल. दुसऱ्यानं लिहिलं की, अरे त्याला इतका मोठा हार घालून दिला. त्याचं लग्न आहे, अंत्यसंस्कार नाही.