मित्रांच्या आग्रहाखातर नवरदेवाने 'चोली के पिछे क्या है' गाण्यावर ठेका धरला; नवरी नाही, सासराच चिडला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2025 16:04 IST2025-02-02T16:04:12+5:302025-02-02T16:04:28+5:30
Social Viral Trending: दिल्लीतील एका नवरदेवाला त्याच्याच लग्नात नाचणे महागात पडले आहे. या पोस्टवर तऱ्हेतऱ्हेच्या पोस्ट येत आहेत. ते अरेंज्ड मॅरेज नव्हते तर एलिमिनेशन राउंड चालू होता, असे एका युजरने म्हटले आहे. तर मित्रांमुळे बदनाम करण्यात आले, असेही काही जणांनी म्हटले आहे.

मित्रांच्या आग्रहाखातर नवरदेवाने 'चोली के पिछे क्या है' गाण्यावर ठेका धरला; नवरी नाही, सासराच चिडला...
आजकाल लग्नात वेगवेगळे काहीतरी करण्याचे ट्रेंड सुरु झाले आहेत. रिल्ससाठी अनेकजण आपल्या मैत्रिणीच्या लग्नात, मित्राच्या लग्नात काहीही करतात आणि व्हायरल करतात. सोशल मीडियावर याचे हजारो व्हिडीओ दिसतील. असाच मित्रांसोबत व्हिडीओसाठी चोली के पिछे क्या है, गाण्यावर नवरदेवाने केलेला डान्स त्याच्या होणाऱ्या सासऱ्याला आवडला नाही आणि त्याने लग्नच मोडून टाकले आहे.
दिल्लीतील एका नवरदेवाला त्याच्याच लग्नात नाचणे महागात पडले आहे. त्याच्या मित्रांनी वारंवार आग्रह केल्याने हा नवरदेव चोली के पिछे क्या है गाण्यावर नाचत होता. त्याला असे नाचताना पाहून मुलीच्या वडिलांना राग आला आणि त्यांनी लग्न मोडून टाकल्याचा प्रकार घडला आहे. आतापर्यंत दारू पिऊन लग्नाला उभा राहिला किंवा हुंडा मागितला म्हणून मुलींनी लग्न मोडल्याचे व्हिडीओ समोर येत होते. आता हा सासराच नाराज झाल्याचा व्हिडीओ येत आहे.
@xavierunclelite या एक्स हँडलवर एका बातमीचे कात्रण देण्यात आले आहे. आपल्या नातेवाईकांचे मनोरंजन करण्यासाठी वराने 'चोली के पीछे' गाण्यावर नाच केला आणि मुलीच्या वडिलांनी लग्न रद्द केले, असे त्यात म्हटले आहे. या बातमीसोबत एक जाहिरात आहे, त्या जाहिरातीवरून सोशल मीडियावर अचजग-गजब रिप्लायना प्रसिद्ध असलेल्या झेविअर अंकल नावाच्या पात्राने मी अशाप्रकारची जाहिरात प्लेसमेंट कुठेच पाहिली नसल्याची खिल्लीही उडविली आहे. प्रत्येकाला फुकटचे मनोरंजन आवडते, अशा आशयाची ही जाहिरात आहे.
या पोस्टवर तऱ्हेतऱ्हेच्या पोस्ट येत आहेत. ते अरेंज्ड मॅरेज नव्हते तर एलिमिनेशन राउंड चालू होता, असे एका युजरने म्हटले आहे. तर मित्रांमुळे बदनाम करण्यात आले, असेही काही जणांनी म्हटले आहे.