अंतराळातून असा दिसतो हिमालय पर्वत, या फोटोसाठी आपण अंतराळवीरांचे आभार मानले पाहिजे!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2021 11:41 AM2021-06-04T11:41:19+5:302021-06-04T11:45:22+5:30

इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवरून दोन अंतराळवीरांनी ट्विटरवर काही फोटो शेअर केले आहेत. Mark T.Vande Hei यांनी हिमालय पर्वताचा एक खास फोटो शेअर केलाय.

Astronauts share photos of Himalaya and Italy from International Space Station | अंतराळातून असा दिसतो हिमालय पर्वत, या फोटोसाठी आपण अंतराळवीरांचे आभार मानले पाहिजे!

अंतराळातून असा दिसतो हिमालय पर्वत, या फोटोसाठी आपण अंतराळवीरांचे आभार मानले पाहिजे!

googlenewsNext

सोशल मीडियावर सर्फींग करताना नेहमीच मंगळ ग्रह, चंद्र, आकाशगंगा, इतर गॅलक्सी, पृथ्वीचे आकाशातून घेण्यात आलेले एकापेक्षा एक भारी फोटो नेहमीच बघायला मिळतात. खरंतर हे सगळं टेक्नॉलॉजीमुळे आपल्याला बघायला मिळतं. यासाठी टेक्नॉलॉजीचे आपण आभारच मानायला पाहिजे. 

सोशल मीडियावर हिमालयाचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. असाच एक खास फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवरून दोन अंतराळवीरांनी ट्विटरवर काही फोटो शेअर केले आहेत. Mark T.Vande Hei यांनी हिमालय पर्वताचा एक खास फोटो शेअर केलाय. यात ढगांमध्ये, बर्फाखाली दडलेला हिमालय पर्वत दिसतो आहे. हिमालयाचे अनेक फोटो पाहिले गेले असतील, पण असा नक्कीच कुणी पाहिला नसेल.

तर दुसरा अंतराळवीर Shane Kimbrough ने इटलीतील शहर Turin चा फोटो शेअर केला आहे. त्यानी लिहिले की, इटली आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवरून सहजपणे दिसतं.

ट्विटरवर अनेक यूजर्सनी हा नजारा पाहून आनंद व्यक्त केलाय. अनेकांनी हा फोटो रिट्विटही केला आहे.

Web Title: Astronauts share photos of Himalaya and Italy from International Space Station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.