Assam News: आसाममधून एक विचित्र घटना समोर आली आहे. घटस्फोटानंतर एका तरुणाने आनंद व्यक्त करत चक्क दुधाने आंघोळ केली. 'आता मुक्त झालोय...मी खूप आनंदी आहे', असे तो म्हणाला. सध्या या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही अनोखी घटना आसामच्या नलबारी जिल्ह्यातून समोर आली आहे. या तरुणाचे माणिक अली आहे. त्याने सांगितले की, त्याची पत्नी वारंवार प्रियकरासोबत पळून जायची. याला कंटाळून त्याने तिला अखेर घटस्फोट दिला. त्यानंतर आनंद साजरा करण्यासाठी चक्क दुधाने अंघोळ केली. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, माणिक अली त्याच्या घराबाहेर दुधाने भरलेल्या चार बादल्या अंगावर ओतून घेताना दिसतोय.
'आता मी मुक्त झालो...'
दूध अंगावर ओतताना म्हणतो, 'माझी पत्नी वारंवार प्रियकरासोबत पळून जायची. मी फक्त कुटुंबामुळे शांत होतो. काल माझ्या वकिलाने मला सांगितले की, घटस्फोट निश्चित झाला आहे. म्हणूनच आज मी दुधाने आंघोळ करुन स्वातंत्र्य साजरे करतोय. आजपासून मी मुक्त झालोय,' अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. स्थानिकांच्या मते, त्याची पत्नी यापूर्वी दोनदा घर सोडून पळून गेली होती. अखेर दोघांनीही परस्पर संमतीने घटस्फोट घेतला आहे.