शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

April Fool's Day 2019 : एप्रिल फूल दिवस का साजरा केला जातो? कशी झाली सुरुवात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 10:15 IST

१ एप्रिललाच 'एप्रिल फूल' हा दिवस का साजरा केला जातो?  याबद्दल तुम्हाला माहितेय का ?

(Image Credit : www.grunge.com)

लहानग्यांपासून ते वयस्करांपर्यंत सर्वजण एकमेकांना मुर्ख बनविण्याचा दिवस म्हणजे १ एप्रिल. पण १ एप्रिललाच 'एप्रिल फूल' हा दिवस का साजरा केला जातो?  याबद्दल तुम्हाला माहितेय का ? चला जाणून घेऊ याचं कारण आणि कधी व कुठे झाली याची सुरुवात...

कशी झाली सुरूवात?

एप्रिल फूल साजरा करण्याची सुरूवात फ्रान्समधून झाली.  पॉप ग्रेगरी १३ यांनी १५८२ यांनी प्रत्येक युरोपियन देशाला ज्यूलियन कॅलेंडर सोडून ग्रेगोरियन कॅलेंडर वापरण्याचे निर्देश दिले. ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये नवे वर्षे हे १ एप्रिलपासून नाही तर १ जानेवारीपासून सुरू होतं. अनेक लोकांनी हे मानण्यास नकार दिला तर काहींना याबद्दल माहितीही नव्हती. यामुळे ते नववर्ष १ एप्रिललाच साजरे करतात. अशांना एप्रिल फूल म्हटले जाऊ लागले. यादिवशी प्रॅंक करून एकमेकांना मुर्ख बनवू लागले. बघता बघता ही प्रथा युरोपमध्ये पसरली.

जगभरात १ एप्रिल 

संपूर्ण जगात हा दिवस एकमेकांना मुर्ख बनविण्यासाठी साजरा केला जाऊ लागला. जपान आणि जर्मनीमध्ये पूर्ण दिवस लोक प्रॅंक करत असतात. स्कॉटलॅंडमध्ये सलग २ दिवस हा दिवस साजरा केला जातो. फ्रान्समध्ये याला 'फिश डे' असे म्हटले जाते. यादिवशी लहान मुल कागदाची मच्छी एकमेकांच्या पाठीवर चिटकवून दिवस साजरा करतात.   

एप्रिल फूलच्या इंटरेस्टींग गोष्टी

१) एप्रिल फूलचं सर्वात लोकप्रिय प्रॅंक एखाद्या पाठीवर कागदाचा मासा किंवा स्टीकर चिटकवणे आहे. याला एप्रिल फिश असंही म्हटलं जातं. 

२) पहिला एप्रिल फूल डे कधी साजरा केला होता माहीत आहे का? पहिल्या मुर्ख दिवसाचा रेकॉर्ड १३९२ मध्ये आढळला होता. याचा अर्थ हा दिवसा तेव्हापासून साजरा केला  जात असावा असा अंदाज आहे. 

३) काही देशांमध्ये एप्रिल फूलच्या गमती-जमती केवळ दुपारपर्यंतच केल्या जातात. 

४) स्कॉटलॅंडमध्ये लोक दोन दिवस मुर्ख दिवस साजरा करतात. दुसऱ्या दिवसाला इथे 'टेली डे' म्हटले जाते. 

५) Google ने एप्रिल फूलच्या पूर्वसंध्येला Gmail लॉन्च केलं होतं. पण अनेकांना हेच वाटलं होतं की, ही एक गंमत आहे. पण हे खरं होतं. 

टॅग्स :April Fool Dayएप्रिल फूल