बाबो! 'अँटीव्हायरस टिफिन' खाण्यासाठी लोक करताहेत गर्दी, वाचा 'या' भन्नाट हॉटेलची खासियत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2020 15:26 IST2020-11-05T15:26:11+5:302020-11-05T15:26:40+5:30
Viral News of Antivirus tiffin center in Marathi: एका दुकानदाराने लोकांना संसर्गापासून वाचवण्यासाठी आणि त्यांना शुद्ध व ताजा आहार देण्यासाठी अँटीव्हायरस टिफिन सेंटर सुरू करण्याचा दावा केला आहे

बाबो! 'अँटीव्हायरस टिफिन' खाण्यासाठी लोक करताहेत गर्दी, वाचा 'या' भन्नाट हॉटेलची खासियत
कोरोना माहामारीच्या परिस्थितीत लोक संसर्ग टाळण्यासाठी वेगवेगळ्या युक्तींचा अवलंब करीत आहेत, कोरोनापासून बचाव होईल अशा ठिकाणाची त्यांना कुठूनही काही माहिती मिळते. तिथे ते लोक पोहोचतात. असाच एक फोटो ओडिसामधून तुफान व्हायरल झाला आहे. ओडिसामधील एका दुकानदाराने लोकांना संसर्गापासून वाचवण्यासाठी आणि त्यांना शुद्ध व ताजा आहार देण्यासाठी अँटीव्हायरस टिफिन सेंटर सुरू करण्याचा दावा केला आहे. यामुळे आता सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. तेथे लोक मोठ्या संख्येने जेवण घेण्यासाठी पोचत आहेत.
मंगळवारी एका सोशल मीडिया युजरने अँटीव्हायरस टिफिन सेंटरच्या रस्त्याच्या कडेच्या रेस्टॉरंटचे फोटो पोस्ट केला, त्यानंतर हे फोटो व्हायरल झाले. फोटोतील मेनू बोर्डावर तुम्ही पाहू शकता, अँटीव्हायरस टिफिन सेंटर बेरहमपूरच्या गांधीनगर , मेन रोडमध्ये आहे. मेनूनुसार अँटीव्हायरस टिफिन सेंटरमध्ये इडली, डोसा, समोसा, उपमा, वडा, पुरी आणि डंपलिंग सारख्या खाद्यपदार्थ उपलब्ध आहेत. बरेच लोक सहज या हॉटेलच्या समोर जेवताना दिसून येतात. Video : चालत्या ट्रेनमध्ये चिमुरड्यानं केला असा काही स्टंट; व्हिडीओ पाहून तुमचीही उडेल झोप
या हॉटेलमध्ये बसण्याची व्यवस्था नाही. पण तुम्ही उभं राहून इथे आपल्या हवा तो पदार्थ मागवून खाऊ शकता. या अँटी व्हायरस टिफिन सेंटरबाबत बरेच लोक सोशल मीडियावर मजेशीर कमेंट्स देत आहेत. एका युजरने कमेंट केली आहे की, एंटी व्हायरस फूड सेंटरमध्ये अन्नासोबत सॅनिटायजर नसेल अशी आशा करतो. बोटीनं प्रवास करत होत्या दोघी, अन् देवमाश्यानं अख्खी बोट तोंडात घातली; पाहा थरारक व्हिडीओ