आनंद महिंद्रांनी शेअर केला 'ओबेरॉय हॉटेल'चा फोटो; सर्वांनाच दिला मोलाचा संदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2022 20:37 IST2022-02-28T20:34:03+5:302022-02-28T20:37:33+5:30

उद्योगपती आनंद महिद्रांनी शेअर केला फोटो; सर्वांनाच दिला प्रेरणादायी संदेश

anand mahindra shares viral photo of oberoi hotel on a makeshift shop | आनंद महिंद्रांनी शेअर केला 'ओबेरॉय हॉटेल'चा फोटो; सर्वांनाच दिला मोलाचा संदेश

आनंद महिंद्रांनी शेअर केला 'ओबेरॉय हॉटेल'चा फोटो; सर्वांनाच दिला मोलाचा संदेश

दिग्गज उद्योगपती आनंद महिंद्रा सोशल मीडियावर अनेक रंजक गोष्टी, फोटो, व्हिडीओ शेअर करत असतात. आज महिंद्रा यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर केला. त्याची जोरदार चर्चा झाली. महिंद्रा यांनी चहा-कॉफीच्या एका टपरीचा फोटो ट्विट केला. 

आनंद महिद्रांनी शेअर केलेल्या टपरीवर ठळक अक्षरांत ऑबेरॉय हॉटेल अशी पाटी आहे. टपरीवर मध्यभागी चहा, कॉफीचा उल्लेख आहे. आमची दिल्लीत इतर कुठेही शाखा नाही, अशी टिपही खाली देण्यात आली आहे. हा फोटो शेअर करताना आनंद महिंद्रानी एक मोलाचा संदेश दिला आहे. मोठी स्वप्नं पाहा, असं महिंद्रांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

महिंद्रा यांनी शेअर केलेला फोटो आणि त्याखाली दिलेला संदेश अनेकांना भावला आहे. अनेकांनी ट्विटला कमेंट्स केल्या आहेत. स्वप्नं पाहण्यासोबतच त्यासाठी मेहनतही करायला हवी. तेव्हाच ती स्वप्नं पूर्ण होतात, असं एका यूजरनं म्हटलं. तर दुसऱ्या एका व्यक्तीनं जगप्रसिद्ध ओबेरॉय हॉटेलची कहाणीदेखील अशीच आहे. त्यांची सुरुवातही अशीच झाली होती, याकडे लक्ष वेधलं.

Web Title: anand mahindra shares viral photo of oberoi hotel on a makeshift shop