'दुधात प्लास्टिक' असलेला व्हिडीओ तयार करणाऱ्यावर अमूलकडून गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2019 06:11 PM2019-12-29T18:11:25+5:302019-12-30T02:25:27+5:30

काही दिवसांपूर्वी सोशल मिडियावर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला होता.

Amul lodges extortion complaint over viral video of amul gold milk with plastic | 'दुधात प्लास्टिक' असलेला व्हिडीओ तयार करणाऱ्यावर अमूलकडून गुन्हा दाखल

'दुधात प्लास्टिक' असलेला व्हिडीओ तयार करणाऱ्यावर अमूलकडून गुन्हा दाखल

Next

काही दिवसांपूर्वी सोशल मिडियावर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. या व्हिडीओत असा दावा केला होता की  अमूल कंपनी भेळयुक्त दूध विकत आहे. जवळपास ३ मिनीट ५७ सेकंदाचा हा व्हिडीओ होता. त्या व्हिडीओत असं दाखवण्यात आलं की अमूल गोल्ड दूध उकळल्यानंतर अशा प्रकारे दिसत होते. जसं त्यात प्लास्टिकचा समावेश आहे. अशी खोटी माहिती पसरवत असलेल्या व्यक्तीवर अमूल कंपनीने गुन्हा दाखल केला  आहे. 

प्रयागराज या ठिकाणी  हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आणंद गुजरातमधील अमूल ब्रॅण्डच्या कोऑपरेटिव मिल्क मार्केटिंग फेडरेशन (जीसीएमएमएफ) मार्फत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या व्हिडीयोत असं सांगण्यात आले होेते की अमूल दुधापासून दही तयार  होते. कारण त्यात प्लास्टीक आहे.

जीसीएमएमएफच्या अधिकारी वर्गाने हा व्हि़डिओ सोशल मिडियावरून काढून टाकण्याची मागणी केली तेव्हा आोरोपीने १० लाख रुपयांची मागणी केली. त्यामुळे या व्यक्तीविरूध्द भारतीय दंडसंहिता कलम ३८६ वसुली  तसेच कलम ४९९ मानहानी या कलमांअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

जीसीएमएमएफचे  अधिकारीं म्हणाले की अमूल हा संदेश सगळ्यांना देऊ इच्छीत आहे की अमूलच्या उत्पादनांशी निगडीत सोशल मिडियावर जर कोणीही ग्राहकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तर त्या व्यक्तीला माफ केलं जाणार नाही. तसेच दुधापासून दही तयार करणे ही सामान्य प्रकिया आहे अशी प्रतिक्रीया दिली.

Web Title: Amul lodges extortion complaint over viral video of amul gold milk with plastic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.