तुम्ही कधी पाण्याखाली पोहणारा पक्षी पाहिलाय? मग हा अनोखा व्हिडिओ एकदा पाहाच...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 19:57 IST2023-03-24T19:57:00+5:302023-03-24T19:57:45+5:30
OMG Video: सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय.

तुम्ही कधी पाण्याखाली पोहणारा पक्षी पाहिलाय? मग हा अनोखा व्हिडिओ एकदा पाहाच...
American Dipper Underwater: पक्षी आकाशात उडतो हे आपल्या सर्वांना माहित आहे. पण, एखाद्या पक्षाला पाण्यात पोहताना तुम्ही पाहिलंय का? तुमचे उत्तर नाही, असेच असेल. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण पाण्यात पोहणारा पक्षी अस्थित्वात आहे. आज आम्ही तुम्हाला असा व्हिडिओ दाखवणार आहोत, ज्यात पक्षी चक्क पाण्याच्या आत पोहताना दिसत आहे.
व्हिडिओमध्ये जो पक्षी पाण्याखाली पोहत आहे, त्याचे नाव अमेरिकन डिपर (Americal Dipper) आहे. नावातून समजून येईल की, हा पक्ष अमेरिकेत आढळतो. व्हिडिओत हा अमेरिकन डिपर आरामाने पाण्याखाली पोहताना दिसत आहे. विशेष म्हणजे, हा नदीच्या प्रवाहाविरोधात पोहत आहे. पाण्याखाली जाऊन तो आपले अन्न शोधण्याचा प्रयत्न करतोय.
हा पक्षी प्रामुख्याने मध्य अमेरिका आणि पश्चिम-उत्तर अमेरिकन परिसरात आढळतो. इंस्टाग्रामवर raptorheart नावाच्या अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 4 लाख 70 हजारांपेक्षा अधिकवेळा पाहिला गेला आहे. या व्हिडिओवर नेटकरी विविध प्रतिक्रियाही देत आहेत.