अरे देवा! तूफान गर्दी असलेल्या रेल्वेत प्रवाशांना बसवण्याचा व्यक्तीचा भन्नाट जुगाड, बघून व्हाल अवाक्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2024 15:06 IST2024-10-18T15:05:38+5:302024-10-18T15:06:59+5:30
Viral Video : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात रेल्वेच्या गेटमधून आत जायला जागा नसल्याने लोक कुलीच्या मदतीने कसा जुगाड करून आत शिरत आहेत.

अरे देवा! तूफान गर्दी असलेल्या रेल्वेत प्रवाशांना बसवण्याचा व्यक्तीचा भन्नाट जुगाड, बघून व्हाल अवाक्...
Viral Video : रेल्वेने प्रवास करणं एक वेगळाच अनुभव असतो. हा प्रवास स्वस्त आणि आरामदायक असतो. पण हे तेव्हा होतं जेव्हा तुमचं तिकीट कन्फर्म असतं. देशात उत्सवांच्या सीझनमध्ये सीटवर बसायला काय उभं रहायलाही जागा नसते. कारण या दिवसात दुसऱ्या शहरांमध्ये नोकरी-काम करणारे लोक आपल्या गावी परतत असतात. त्यामुळे रेल्वेत तूफान गर्दी असते. अशात लोक जागा मिळवण्यासाठी वाट्टेल ते करतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात रेल्वेच्या गेटमधून आत जायला जागा नसल्याने लोक कुलीच्या मदतीने कसा जुगाड करून आत शिरत आहेत.
22 सेकंदाचा हा व्हिडिओत तुम्ही बघू शकता की, एक रेल्वे प्लॅटफॉर्मवर उभी आहे. गर्दी इतकी आहे की, बऱ्याच लोकांना रेल्वेच्या आत शिरायलाही मिळालेलं नाही. अशात एक कुलीसारखे कपडे घातलेल्या व्यक्तीच्या मदतीने इमरजन्सी दरवाज्यातून आत शिरत आहे. ही व्यक्ती लोकांना उचलून आत टाकत आहे.
“ट्रैन पर बैठा कर आऊँगा” got real 🚊👀 pic.twitter.com/lBQuL4l2j1
— Tamanna 💞 (@BewithTamanna) October 14, 2024
सोबतच त्यांच्या बॅगही टाकत आहे. हा व्हिडीओ बघून लोक हैराण झाले आहेत.
हा व्हिडीओ एक्सवर @BewithTamanna नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच लोक यावर अनेक मजेदार कमेंट्सही करत आहेत. एकाने लिहिलं की, अरे...असं कुणी गाडीत बसवतं का?