VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 19:07 IST2025-12-16T19:06:56+5:302025-12-16T19:07:26+5:30
Christmas Tree Hairstyle Viral Video: ही हेअरस्टाईल करणं एकदमच सोपं आहे, कशी... समजून घ्या

VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
Christmas Tree Hairstyle Viral Video: एखाद्या व्यक्तीचा लूक बदलण्यात हेअरस्टाईल खूप महत्त्वाची भूमिका बजावते. म्हणूनच लोक सतत त्यांच्या केसांवर विविध प्रयोग करत असतात. कुणी कधीतरी ट्रेंडी कट करतात, तर कधी वेगळ्या प्रकारचे हेअर एक्स्टेंशन लावतात. अनेकदा सण-उत्सवाच्या लूकसाठी खास हेअरस्टाईल केली जाते. पण अलीकडेच सोशल मीडियावर समोर आलेला एक व्हिडिओ खूपच आगळावेगळा आहे. त्यामुळेच त्याने लोकांचे लक्ष वेधून घेतले असून, तो व्हायरल झालाय.
ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल
एका इंस्टाग्राम पेजने एका हेअरस्टाईलचा व्हिडीओ पोस्ट केलाय ज्याने लोकांना आश्चर्यचकित केले आहे. या व्हिडिओमध्ये एक अनोखी ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल दाखवण्यात आली आहे. या अनोख्या हेअरस्टाईलसाठी मुलीने एका साध्या बाटलीचा वापर केला. तिने बाटली केसांच्या मध्यभागी ठेवली, जेणेकरून केसांना उंची मिळेल. नंतर केस बाटलीभोवती गुंडाळले आणि ख्रिसमस ट्री तयार केली. केसांचा बेसिक आकार पूर्ण झाल्यावर, तिने केसांभोवती हिरवी झालर गुंडाळली आणि मग ख्रिसमस ट्री सजवली. पाहा व्हिडीओ-
नेटकरी पोट धरून हसले...
लोक या संपूर्ण प्रक्रियेवर हसताना दिसले. व्हिडिओ व्हायरल होताच, कमेंट सेक्शनमध्ये मजेदार प्रतिक्रिया आल्या. एका युजरने मजेत मुलीला 'ख्रिसमस ट्री' ऐवजी 'ख्रिसमस स्त्री' म्हटले. तर दुसऱ्याने लिहिले की ख्रिसमसला आता 'हेअरमस' म्हटले पाहिजे. लोकांनी मजेदार कमेंट केले असले तरीही व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे.