VIDEO : आकाशात दिसला अद्भुत नजारा, जणू खाली पडत आहेत तारे....
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2024 16:10 IST2024-07-06T16:04:27+5:302024-07-06T16:10:10+5:30
Aurora Video : सामान्यपणे असे नजारे ध्रुवांवर दिसतात. आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनमुळे (ISS) तुम्ही आता बघू शकता की, हे नजारे अंतराळातून रात्री कसे दिसतात.

VIDEO : आकाशात दिसला अद्भुत नजारा, जणू खाली पडत आहेत तारे....
Aurora Video : निसर्ग नेहमीच आपल्याला चकित करत असतो. अनेकदा आकाशातील इतके अद्भुत नजारे समोर येत असतात जे बघून विश्वासच बसत नाही. वेगवेगळ्या रंगांच्या आकृती दिसतात. अशा घटना ऑरोरा (Aurora) म्हणतात. तुम्ही प्रकाशाच्या या अनोख्या डान्सचे व्हिडीओ अनेकदा पाहिले असतील. सामान्यपणे असे नजारे ध्रुवांवर दिसतात. आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनमुळे (ISS) तुम्ही आता बघू शकता की, हे नजारे अंतराळातून रात्री कसे दिसतात.
Instagram वर याचा एक सुंदर व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यात हिरव्या रंगाचा ऑरोराचा डान्स बघायला मिळत आहे. या घटनेच्या सुंदरतेचं वर्णन करण्यासाठी ISS ने लिहिलं की, "निसर्गाची आतीशबाजी" आणि लिहिलं की, हा व्हिडीओ तेव्हा रेकॉर्ड करण्यात आला जेव्हा स्पेस स्टेशन पृथ्वीपासून जवळपास २५० मैल वरून उडत होतं.
ISS ने लिहिलं, "हा लाइट शो तेव्हा होतो जेव्हा सूर्यपासून आवेशित कण पृथ्वीच्या मॅग्नेटोस्फीअरवर धडकतात. यातून चमकदार ऑरोरा असतात. जे सतत फिरत असतात". पुढे त्यांनी लिहिलं की, "अनेकदा उत्तर आणि दक्षिणी गोलार्धाच्या जवळपास जमिनीवरून हे दिसतात".
शेअर करण्यात आल्यानंतर या व्हिडीओ ५ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. त्याशिवाय या व्हिडीओला ३६ हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. तर यूजर या व्हिडीओवर अनेक कमेंट्स करत आहेत.