अजब मध्यप्रदेशातील गजब पूल! भोपाळपेक्षा दोन पावले पुढे इंदूर, झेड आकाराचा बांधलाय पूल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 11:23 IST2025-07-10T11:03:49+5:302025-07-10T11:23:02+5:30
काही दिवसापूर्वी भोपाळमधील पूल सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता मध्यप्रदेशातील आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

अजब मध्यप्रदेशातील गजब पूल! भोपाळपेक्षा दोन पावले पुढे इंदूर, झेड आकाराचा बांधलाय पूल
मागील काही दिवसापूर्वी मध्यप्रदेशातील भोपाळमधील एक पूल सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता इंदूरमधील आणखी एक विचित्र पूल समोर आला आहे. शहरातील पोलो ग्राउंडवर 'Z' या इंग्रजी अक्षराच्या आकारात बांधण्यात येणारा रेल्वे ओव्हरब्रिजची आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. या पुलाला दोन ९० अंशाचे कोन आहेत. म्हणजेच इंदूर पुलाबाबतील भोपाळपेक्षा दोन पावले पुढे असल्याची चर्चा सुरू आहे.
Viral Video : विटा आणि सीमेंट बघून काय समजलात? पठ्ठ्यानं घरातच बनवला झकास कूलर; एसीलाही देतोय टक्कर
इंदूरच्या पोलो ग्राउंडवर बांधण्यात येणारा हा रेल्वे ओव्हरब्रिज अनोख्या डिझाइनमुळे चर्चेत आहे. या पुलाला ९० अंशांचे दोन वळणे आहेत, यामुळे तो 'Z' आकाराचा बनतो. ही रचना पाहून काही जण याला अभियांत्रिकीचा चमत्कार म्हणत आहेत तर काही जण याला वाहतुकीचा रोलर कोस्टर म्हणत आहेत. दोन तीक्ष्ण वळणांमुळे येथे अपघात होण्याची भीती आहे.
भोपाळला मागे टाकले
भोपाळचा ऐशबाग ९० अंशाचा पूल सोशल मीडियावर आधीच व्हायरल झाला होता. पण, इंदूरने दोन पावले पुढे जाऊन 'झेड' आकाराचा पूल बांधलाय. हा ब्रिज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली बांधला जात आहे. हा अनोखा पूल चर्चेत येताच, पीडब्ल्यूडीने स्पष्ट केले की डिझाइनमध्ये बदल करण्याचा विचार केला जात आहे. विभागाचे म्हणणे आहे की, हा पूल रेल्वे मार्ग ओलांडण्यासाठी बांधला जात आहे आणि जागेअभावी अशी रचना करण्यात आली आहे.
या 'झेड' आकाराच्या पुलाने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. काही जण याला 'मध्य प्रदेशचा झिग-झॅग चमत्कार' म्हणत आहेत तर काही जण 'ड्रायव्हिंग स्कूलचा टेस्ट ट्रॅक' म्हणत आहेत.