Video : चंद्राजवळ उडताना दिसल्या अनोळखी वस्तू, वैज्ञानिकही झाले हैराण.....
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2020 11:27 IST2020-08-05T11:20:24+5:302020-08-05T11:27:46+5:30
चंद्राचा हा ५९ सेकंदाचा व्हिडीओ क्यूबेक शहरातील एका सायन्स फोटोग्राफरने काढलाय. आतापर्यंत या व्हिडीओला ४५०० पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

Video : चंद्राजवळ उडताना दिसल्या अनोळखी वस्तू, वैज्ञानिकही झाले हैराण.....
चंद्रावर मनुष्याने पाउल ठेवल्याची घटना आता जुनी झाली आहे. पण आजही जगभरातील वैज्ञानिकांमध्ये हा प्रश्न आहे की, चंद्रावर एलियन्स आहेत का? याबाबत जगभरात वेगवेगळ्या थेअरी आहेत. ट्विटरवर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओतून आता पुन्हा ही एलियनबाबतची शंका व्यक्त केली जात आहे.
हा व्हिडीओ फिजिक्स-अॅस्ट्रॉनॉमी @Physicastrono9 नावाच्या ट्विटर हॅन्डलवर शेअर करण्यात आलाय. यात यात सांगण्यात आलं की, चंद्राचा हा ५९ सेकंदाचा व्हिडीओ क्यूबेक शहरातील एका सायन्स फोटोग्राफरने काढलाय. आतापर्यंत या व्हिडीओला ४५०० पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. या बघायला मिळतं की, चंद्राच्या उत्तर पूर्व भागात प्रकाशातून दोन अनोळखी वस्तू उडत आहेत.
🌒 ( amateur footage, Quebec 26/03/20 ) pic.twitter.com/Fi5Aoyxo1Z
— Physics-astronomy (@Physicsastrono9) August 3, 2020
या वस्तू प्रकाशातून निघून अंधाराकडे जाताना दिसतात. यातील एकाची सावली चंद्रावर पडताना दिसते, पण दुसऱ्याची दिसत नाही. त्यानंतर जेव्हा या दोन्ही वस्तू उडत अंधाराकडे येतात तेव्हा चमकदार रंग दिसायला लागतो.
इतकेच नाही तर या दोन वस्तूमागे आणखी तीन अशाच उडणाऱ्या वस्तू दिसतात. या वस्तू नेमक्या काय आहेत याबाबत अजून काहीही माहिती समोर आलेली नाही. पण लोक पुन्हा एलियनची चर्चा करू लागले आहेत. कारण या वस्तू उडत आहेत. अशाप्रकारच्या या वस्तू पहिल्यांदाच कॅमेरात कैद झाल्या आहेत.
हे पण वाचा :
आजच्या दिवशीच भारताच्या शोधात निघाला होता कोलंबस, चुकून भलतीकडेच पोहोचला....
लॉकडाऊनमुळे भारतात अडकली परदेशी महिला, ३ महिन्यात करू लागली शेती अन् शिकली कन्नड भाषा!