Alien like balloon seen in the sky of noida the crowd erupted | बाबो! आकाशात एलियन उडताना पाहून सगळ्यांचीच उडाली झोप; अन् मग झालं असं काही....

बाबो! आकाशात एलियन उडताना पाहून सगळ्यांचीच उडाली झोप; अन् मग झालं असं काही....

निसर्गात अनेकदा  कधीही न पाहिलेले वेगवेगळे जीव आढळून येतात. तेव्हा लोकांना नेहमीच याबाबत आकर्षण वाटतं. पण ग्रेटर नोएडामधील भट्टा-पारसोल गावात शनिवारी आकाशात एलियनसारखी आकृती उडताना दिसली. तुमचा विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे. हा विचित्र प्रकार पाहून अनेकांची झोप उडाली आहे. आकाशात दिसल्यानंतर काही वेळाने ही एलियनप्रमाणे दिसणारी आकृती खाली पडली.

हा  एलियन नक्की आहे तरी कसा, हे पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी झाली. लोक वेगवेगळ्या प्रकारची चर्चा करू लागले. पोलिसांना देखील त्या एलियनजवळ जाण्याची हिंमत होत नव्हती. मात्र एलियनसारखी दिसणारी ही आकृती दुसरे तिसरे काही नसून एक मोठा फुगा आहे असे नंतर स्पष्ट झाले. ही बाब उघड झाल्यानंतर लोकांच्या मनातील धास्ती कमी झाली. 

माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार भट्टा-पारसोल गावाजवळ आकाशात अचानक एलियनसारखी दिसणारी एक आकृती उडताना दिसली. या एलियनला पाहण्यासाठी आसपासच्या परिसरातील अनेक लोक आहे. नंतर हा एलियन जमिनीच्या दिशेने आला आणि खाली असलेल्या झुडुपांमध्ये अडकला.  या प्रकाराबाबत माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस दाखल झाले. मात्र त्या आकृतीजवळ जाण्यास पोलिस देखील चाचपडत होते. देवमासा ठरला देवदूत! Whale ने केली उलटी अन् 'तो' करोडपती झाला ना राव....

हा विचित्र प्रकार एलियन किंवा रोबोट नव्हता, तर एलियनचा चेहरा आणि आकार दिलेला एक फुगा होता. हा फुगा आकाशात उडताना दिसला आणि काही वेळाने खाली कोसळला, असं पोलिसांना तपासादरम्यान दिसून आलं. नोएडा पोलिसांनी या एलियनसारख्या दिसणाऱ्या फुग्याचा फोटो ट्विट करत या घटनेबाबत स्पष्टीकरण दिले आहे.  गावात विकास झालाय का? असं रिपोर्टरने विचारलं, अन् आजोबांनी दिलेलं उत्तर झालं व्हायरल

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Alien like balloon seen in the sky of noida the crowd erupted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.