एअर हॉस्टेसचे बादशाहच्या 'या' गाँण्यावर ठुमके, डान्स पाहुन नेटीझन्स झाले घायाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2021 17:05 IST2021-12-15T17:05:33+5:302021-12-15T17:05:43+5:30

अनेक एअर हॉस्टेस त्यांच्या डान्सच्या ठुमक्यांनी नेटीझन्सना घायाळ करत आहेत. अश्याच एका एअर हॉस्टेसचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यात तिने असा भन्नाट डान्स केलाय की पाहणारे पाहतच राहतील.

air hostess dancing on badshah's jugnu song goes viral on internet | एअर हॉस्टेसचे बादशाहच्या 'या' गाँण्यावर ठुमके, डान्स पाहुन नेटीझन्स झाले घायाळ

एअर हॉस्टेसचे बादशाहच्या 'या' गाँण्यावर ठुमके, डान्स पाहुन नेटीझन्स झाले घायाळ

सध्या इंटरनेटवर डान्स व्हिडिओचा ट्रेंड आहे. त्यातही अनेक एअर हॉस्टेस त्यांच्या डान्सच्या ठुमक्यांनी नेटीझन्सना घायाळ करत आहेत. अश्याच एका एअर हॉस्टेसचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यात तिने असा भन्नाट डान्स केलाय की पाहणारे पाहतच राहतील.

इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक एअर होस्टेस दिसत आहे. जी आधीपासूनच तिच्या डान्स व्हिडीओमुळे चर्चेत आहे. तिचे नाव आयात. इंडिगोच्या या एअर होस्टेसने एक नवीन व्हिडीओ क्लिप पोस्ट केली आहे. जो व्हिडीओ, नेटिझन्सना आता खूप आवडला आहे. नवीन व्हिडिओमध्ये, आयतने बादशाहचे व्हायरल गाणं ‘जुगनू डान्स ट्रेंड’ वर डान्स केलेला दिसत आहे.

या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्येही अनेक प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एअर होस्टेस तिच्या सुंदर पोशाखात डान्स करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये तरुणीने शॉर्ट स्कर्ट घातला आहे आणि ती खूप एनर्जीने डान्स करत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स मिळाले आहेत, तसेच हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या इतर प्लॅटफॉर्मवरही शेअर केला जातो आहे.

Web Title: air hostess dancing on badshah's jugnu song goes viral on internet