'दिल तो बच्चा है जी' , आज्जाींचा उत्साह, घसरगुंडीवरुन थेट तोंडावर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2022 13:53 IST2022-11-20T13:51:12+5:302022-11-20T13:53:02+5:30
घसरगुंडीवरुन खेळाची मजा घेण्यासाठी आज्जी गेल्या मात्र तोंडावरच आपटल्या.

'दिल तो बच्चा है जी' , आज्जाींचा उत्साह, घसरगुंडीवरुन थेट तोंडावर...
म्हातारपणी आपण पुन्हा लहान होतो असे म्हणतात. बालपणसारखेच हट्ट, रुसवे फुगवे, खाण्यापिण्याचे नखरे हे म्हातारपणातही होतात. उतरत्या वयात माणुस पुन्हा लहान होऊन जातो. अशीच मजा एका आज्जीबाईंच्या व्हिडिओमधुन येते. घसरगुंडीवरुन खेळाची मजा घेण्यासाठी आज्जी गेल्या मात्र तोंडावरच आपटल्या.
इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओतील आज्जींनी चक्क नव्वारी नेसली आहे. लहान मुलांसोबत त्या घसरगुंडीवर चढल्या खरं मात्र खाली आल्यावर तोंडावरच आपटल्या. यानंतर त्यांचे त्यांनाच हसू आले. फार लागले नाही म्हणून नाहीतर आज्जीबाईंचा प्रचंड उत्साह पाहून पोरंही मजा घेताना दिसत आहेत.