Viral Video : आई-बाबाने चिमुकल्याला दाखवली क्यूट जादू, व्हिडीओला ४० लाख मिळाले व्ह्यूज!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 03:46 PM2021-03-16T15:46:11+5:302021-03-16T15:46:47+5:30

हा व्हिडीओ एका कपलचा असून यात ते त्यांच्या मुलाला एक क्यूट जादू दाखवत आहेत. जेव्हा ही जादू पूर्ण होते तेव्हा मुलगा खळखळून हसायला लागतो.

After watching parents water magic trick this kids innocent laughter win people heart viral video | Viral Video : आई-बाबाने चिमुकल्याला दाखवली क्यूट जादू, व्हिडीओला ४० लाख मिळाले व्ह्यूज!

Viral Video : आई-बाबाने चिमुकल्याला दाखवली क्यूट जादू, व्हिडीओला ४० लाख मिळाले व्ह्यूज!

Next

लहान मुलांच्या निरागसपणाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पण ताजा व्हिडीओ इतका भारी आहे की, लोक या व्हिडीओतील मुलाच्या प्रेमात पडले आहेत. हा व्हिडीओ एका कपलचा असून यात ते त्यांच्या मुलाला एक क्यूट जादू दाखवत आहेत. जेव्हा ही जादू पूर्ण होते तेव्हा मुलगा खळखळून हसायला लागतो. लोकांना मुलाचा हाच निरागसपणा भावला आहे. 

हा व्हिडीओ ट्विटर यूजर @GoodNewsCorres1 ने शेअर केला आहे. त्याने कॅप्शनला लिहिले आहे की, 'जादू! इटलीचा या मुलाला वाटत आहे की, त्याच्या आई-बाबाने त्याचे पकडल्याने हातातून पाणी पास होत आहे'. आतापर्यंत या व्हिडीओला ४० लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. आणि ७७ हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.

तुम्ही बघू शकता की, पाण्याने भरलेल्या बॉटलचं छाकण उघडून महिला बॉटल कपाळावर लावते. यानंतर ती मुलाचा हात हातात घेते आणि मुलगा दुसरा हात वडिलांच्या हातात देतो. आणि त्याचे वडील तोंडातून पाणी काढतात. हे बघून तो खळखळून हसू लागतो.
 

Web Title: After watching parents water magic trick this kids innocent laughter win people heart viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.