शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

मास्क काढल्याने महिलेनं विमानातच वृद्ध माणसाच्या कानशिलात लगावले, घटना कॅमेऱ्यात कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2021 18:25 IST

विमानात बसल्यावर मास्क काढलेल्या व्यक्तीचा महिलेला इतका राग आला की तिने त्याच्याशी थेट भांडणच उकरून काढलं. ते भांडण इतकं विकोपाला गेलं की त्या महिलेनं त्या वृद्ध माणसाच्या कानशिलात लगावली

विमानात (Flight) एका प्रवाशाने (Traveller) स्वतःच्या चेहऱ्यावरचा मास्क (Face Mask) काढल्यामुळे रागावलेल्या महिलेनं (Angry Woman) त्याच्या कानशिलात (Slapped on face) भडकावल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. कोरोनाचा प्रभाव (Corona impact) कमी झाल्याचं गेल्या काही महिन्यांत वाटत असलं तरी ओमिक्रॉनमुळे पुन्हा एकदा जगभर भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये पुन्हा एकदा भीती आणि चिंता या भावना घर करत असून स्वतःचा कोरोनापासून बचाव करण्यासाठी ते सर्वतोपरी मदत करत आहेत. त्यामुळेच विमानात बसल्यावर मास्क काढलेल्या व्यक्तीचा महिलेला इतका राग आला की तिने त्याच्याशी थेट भांडणच उकरून काढलं. 

फ्लोरिडाहून टेंपासाठी जात असलेल्या विमानात एका महिलेनं अक्षरशः गोंधळ घातला. या विमानात महिलेच्या शेजारी एक ज्येष्ठ नागरिक बसले होते. त्यांनी विमानात येताना मास्क लावला होता. मात्र विमानात बसल्यानंतर त्यांनी चेहऱ्यावरून तो मास्क खाली घेतला. या प्रकारामुळे संतापलेली महिला जागेवरून उठली आणि नागरिकाशी वाद घालायला सुरुवात केली. बघता बघता हे भांडण विकोपाला गेलं आणि इतरांना मध्यस्थी करण्याची गरज निर्माण झाली. 

व्हिडिओत दिसत असल्याप्रमाणे सुुरुवातीला सुरु झालेल्या वादाचं रुपांतर हळूहळू शिवीगाळ आणि आरडाओरडा यात झालं. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांच्या बोलण्याचा राग अनावर होऊन महिलेनं त्यांच्या कानशिलात लगावली. त्यानंतर मात्र विमानातील कॅबिन क्रूनं पोलिसांना पाचारण केलं. पॅट्रिशिया कॉर्नवॉल असं या महिलेचं नाव आहे. 

 

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाcorona virusकोरोना वायरस बातम्याairplaneविमानInstagramइन्स्टाग्राम