समुद्राच्या लाटेत वाहून जाणाऱ्या मुलीला कुत्र्याने वाचवलं; व्हिडीओ व्हायरल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2018 18:23 IST2018-08-14T18:21:31+5:302018-08-14T18:23:13+5:30
कुत्रा हा आपल्या मालकाशी इमानदार असतो अशी उदाहरणं आपण नेहमी पाहतो. असंच एक उदाहरण एका व्हायरल व्हिडीओमधून समोर आलं आहे.

समुद्राच्या लाटेत वाहून जाणाऱ्या मुलीला कुत्र्याने वाचवलं; व्हिडीओ व्हायरल!
कुत्रा हा आपल्या मालकाशी इमानदार असतो अशी उदाहरणं आपण नेहमी पाहतो. असंच एक उदाहरण एका व्हायरल व्हिडीओमधून समोर आलं आहे. एक लहान मुलगी समुद्राच्या पाण्यात खेळत होती. अचानक आलेल्या मोठ्या लाटेने ती मुलगी पडली. पण तिच्या बाजूला उभ्या असलेल्या कुत्र्याला ती लाटेबरोबर वाहून जाईल की काय, असे वाटले आणि त्याने तिला वाचवण्याची धडपड सुरू केली.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना फ्रान्समधील आहे. तेथील एका बीचवर Matyas नावाची छोटी मुलगी स्विमिंग करत होती. ती त्या कुत्र्याच्या मालकाची नात आहे. ही घटना इंटरनेटवर व्हायरल झाल्यानंतर सर्वजण त्या कुत्र्याचं कौतुक करत आहेत. हा व्हिडीओ 1 मिलियनपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे.
खरं तर ती मुलगी पाण्यात खेळत असते. ती सुरक्षित असते पण अचानक वाढलेली पाण्याची पातळी आणि लाटांचा जोर कुत्र्याच्या लक्षात येतो. त्यामुळे ती त्या लाटांमधून वाहून जाईल या भितीने तो आधीच तिला शर्ट खेचून पाण्याबाहेर घेऊन येतो.