शर्माजी के लडके का जलवा! अभिषेक शर्माच्या शर्ट, शूज अन् घड्याळीची किंमत वाचून उडेल झोप!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 12:33 IST2025-02-27T12:32:49+5:302025-02-27T12:33:45+5:30

Abhishek Sharma : नुकताच तो भारत-पाकिस्तान सामान्यादरम्यान दुबईतील स्टेडिअममध्ये दिसला होता. यावेळी त्याचा अंदाज पाहून फॅन खूश झाले होते.

Abhishek Sharma brand new rolex watch worth 13 lakh know shirt and shoe price | शर्माजी के लडके का जलवा! अभिषेक शर्माच्या शर्ट, शूज अन् घड्याळीची किंमत वाचून उडेल झोप!

शर्माजी के लडके का जलवा! अभिषेक शर्माच्या शर्ट, शूज अन् घड्याळीची किंमत वाचून उडेल झोप!

Abhishek Sharma : अभिषेक शर्मा या भारतीय क्रिकेट खेळाडूची चर्चा टी२० दरम्यान चांगलीच झाली. त्यानं इंग्लंड विरूद्ध चांगलीच फटकेबाजी केली. त्याच्या खेळाचं चांगलं कौतुकही करण्यात आलं. त्याची लोकप्रियताही चांगली वाढली आहे. अभिषेक त्याच्या दमदार खेळासोबतच स्टायलिश अंदाजासाठीही सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतो. नुकताच तो भारत-पाकिस्तान सामान्यादरम्यान दुबईतील स्टेडिअममध्ये दिसला होता. यावेळी त्याचा स्टायलिश अंदाज पाहून फॅन खूश झाले होते. आता त्यानं यावेळी घातलेल्या शर्टची, घड्याळीची आणि शूजच्या किंमतीची चर्चा रंगली आहे.

वेगवेगळ्या क्रिकेटरच्या घड्याळींची आणि त्यांच्या किंमतीची नेहमीच चर्चा होत असते. त्याच्या हातात स्विस ब्रॅन्ड रोलेक्सची महागडी घड्याळ आहे. या ब्रॅन्डची घड्याळ असणं एक फॅशन स्टेटस झालं आहे. इतर घड्याळींच्या तुलनेत ही घड्याळ खूप महाग असते. 

मीडिया रिपोर्टनुसार, अभिषेकनं घातलेल्या घड्याळीची किंमत जवळपास ९, ९०, ००० रूपये इतकी आहे. तर याची मार्केट व्हॅल्यू जवळपास १६ हजार डॉलर म्हणजेच १३,९८,००० रूपये इतकी आहे. अभिनेष शर्मासोबतच भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार रोहित शर्मा देखील रोलेक्सचं घड्याळ वापरतो. रोहितच्या घड्याळीची किंमत जवळपास ४१,५७,००० रूपये इतकी आहे.

अभिषेकच्या घड्याळीसोबतच त्याचं शर्ट आणि शूजचीही किंमत लाखोंच्या घरात आहे. अभिषेकनं घातलेलं CASABLANCA या प्रसिद्ध ब्रॅन्डचं शर्ट आहे. या प्रिंट शर्टची किंमत तब्बल १,२२,८६४ रूपये इतकी आहे. तर अभिषेकनं LOUIS VUITTON या ब्रॅन्डचा शूज घातला होता, त्याची किंमत १,३०,००० रूपये इतकी आहे.

Web Title: Abhishek Sharma brand new rolex watch worth 13 lakh know shirt and shoe price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.