Aamir Liaquat Hussain: पाकिस्तानी खासदाराचे १८ वर्षांच्या पत्नीसोबतचे खासगी व्हिडीओ व्हायरल; नेटकऱ्यांमध्ये खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2022 15:44 IST2022-02-16T15:44:08+5:302022-02-16T15:44:16+5:30
Aamir Liaquat Hussain and Dania Shah: पाकिस्तानी खासदार अमीर लियाकत हुसैन आणि त्याची पत्नी सैयदा दानिया शाह यांचे काही खासगी क्षणांचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियात आले आहेत.

Aamir Liaquat Hussain: पाकिस्तानी खासदाराचे १८ वर्षांच्या पत्नीसोबतचे खासगी व्हिडीओ व्हायरल; नेटकऱ्यांमध्ये खळबळ
सध्या पाकिस्तानी खासदार आणि त्याची १८ वर्षीय पत्नी सोशल मिडीयावर धुमाकूळ घालत आहेत. जगभरात या जोडप्याची चर्चा आहे. कारण हे त्या खासदाराचे तिसरे आणि ते देखील वयाने खूपच लहान असलेल्या तरुणीसोबत केलेले लग्न आहे. सोशल मिडीयावर लोक या जोडप्याला नको नको ते बोलत आहेत.
पाकिस्तानी खासदार अमीर लियाकत हुसैन आणि त्याची पत्नी सैयदा दानिया शाह यांचे काही खासगी क्षणांचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियात आले आहेत. महत्वाचे म्हणजे हे व्हिडीओ त्याच्या पत्नीनेच पोस्ट केले आहेत. यावर आता लोकांच्या चार दिन की चांदणी अशा प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. अमीर हा ४८ वर्षांचा आहे, तर दानिया ही १८ वर्षांची आहे.
दानियाने शेअर केलेल्या या रोमँटिक व्हिडीओमध्ये ती पतीच्या तीन लग्नांबद्दल त्याची स्तुती करत आहे. सोबतच तिचा पती खूप इस्लामिक असल्याचे म्हणत आहे. दानियाने नुकताच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये दानिया आणि आमिर एकमेकांशी बोलत आहेत. मागे एक बॉलिवूड गाणे वाजत आहे. या व्हिडिओमध्ये दानिया आमिरसोबत खूप खुश दिसत आहे. मात्र, आमिर आणि त्याची पत्नी त्यांचे खासगी व्हिडिओ शेअर करत असल्या बद्दल काही लोक नाराजी व्यक्त करत आहेत.
दुसऱ्या व्हिडिओमध्ये दानिया आमिरच्या मिठीत झोपलेली दिसत आहे आणि पंजाबी गाणे वाजत आहे. हा व्हिडिओ शेअर करत दानियाने लिहिले, 'लव्ह यू माय डिअर.'