शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

इंद्रदेवाविरोधात युवकाने घेतली पोलीस ठाण्यात धाव; चक्क देवाविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2022 18:23 IST

पाऊस पडत नाही म्हणून उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीने इंद्रदेवाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

गोंडा : हे सोशल मीडियाचे युग आहे इथे कोणतीच गोष्ट लपून राहू शकत नाही. सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही अनोख्या गोष्टी व्हायरल होत असतात. जेव्हा एखाद्या व्यक्तीला काही समस्या असते तेव्हा ती व्यक्ती संबंधित पोलीस ठाण्यात धाव घेते. मात्र उत्तर प्रदेशातील गोंडामध्ये एका व्यक्तीने चक्क इंद्रदेवाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. एवढेच नाही तर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणीही या व्यक्तीने अधिकाऱ्यांकडे केली आहे. सध्या या घटनेची सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. 

माहितीनुसार, सुमित कुमार यादव नावाच्या व्यक्तीचे म्हणणे आहे की, ही वेळ भात लावणीची आहे, त्यामुळे देशातील काही भागातील शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र पावसाची चिन्हे नाहीत. पावसाअभावी शेतकऱ्यांच्या अडचणीत सातत्याने वाढ होत आहे. विशेष म्हणजे १७ जुलै रोजी परिसरात संपूर्ण समाधान दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला तहसील स्तरावरील अधिकाऱ्यांसह जिल्हास्तरीय अधिकारी देखील उपस्थित होते. झार गावातील रहिवासी सुमितकुमार यादव यांनी पाऊस पडत नाही म्हणून तक्रार दाखल केली आहे. खूप वेळ झाला पाऊस पडत नाही लोक प्रचंड नाराज असून याचा थेट परिणाम शेतीवर होत आहे. त्यामुळे याबाबत लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करावी असे पत्रात म्हटले आहे. 

इंद्रदेवाविरोधात गुन्हा दाखल दरम्यान, आता हे पत्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हे पत्र पाहून अनेक लोकांना धक्का बसला असून या व्यक्तीने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. तसेच कारवाईसाठी तक्रार पत्र तहसीलदार कर्नेलगंज यांच्याकडे पाठवण्यात आले आहे. त्याचबरोबर सोशल मीडियावरील काही मंडळी हास्यास्पद टिप्पणी करत आहे. मात्र पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर असून त्यामुळे खर्च देखील निघत नसल्याचे तक्रारदार शेतकऱ्याचे म्हणणे आहे.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाUttar Pradeshउत्तर प्रदेशFarmerशेतकरीRainपाऊस