Funny Viral Video : हल्ली सोशल मीडियावर असलेल्या बहुतेक लोकांना रील बनवण्याचं जणू व्यसनच लागलं आहे. जर त्यांनी रील बनवलं नाही किंवा एखादा ट्रेंड फॉलो केला नाही तर खूप काहीतरी आपण गमावतोय असं त्यांना वाटत असतं. बरं रील बनवण्यात हरकत काहीच नाही. पण काही लोक रील बनवताना असे काही हावभाव करतात किंवा असे काही कारनामे करतात की बघून डोकं भंजाळून जातं. काही लोक आपल्या रीलकडे लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी अश्लील गोष्टी करतात, तर काही लोक भलताच मूर्खपणा करतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल झालाय. आता जो व्हिडीओ व्हायरल झालाय त्यात दिसून येतं की, एक महिला मेट्रोच्या सीटच्या समोर उभी आहे आणि अचानक रील रेकॉर्ड करू लागते. ना ती गाणं म्हणत आहे, ना डान्स करत आहे. ती अचानक विचित्रपणे हसू लागले आणि सैरभैर पळायला लागते. नेमकं चाललंय काय काहीच कळत नाही. महिलेचा हा व्हिडीओ जर रात्री कुणाला दाखवला तर नक्कीच घाबरल्याशिवाय राहणार नाही. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून लोक महिलेला या विचित्रपणासाठी ट्रोल करत आहेत.
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर ghantaa नावाच्या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आलाय. आतापर्यंत या व्हिडिओला ११ हजारांपेक्षा अधिक लाइक मिळाले आहेत. इतकंच नाही तर अनेक लोकांनी व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिलं की, मेंटल हॉस्पिटलमधून पळून आलीये. दुसऱ्याने लिहिलं की, ही पागल कोण आहे. तिसऱ्याने लिहिलं की, डॉक्टर काय म्हणाले, कधीपर्यंत बरी होणार. तर एका यूजरने लिहिलं की, महिलांच्या कोचमध्ये जायला सांगा. रील बनवणं काही वाईट नाही, पण असा विचित्रपणा केला गेला तर नक्कीच सामान्यपणे ट्रोलचाच सामना करावा लागतो.
Web Summary : A woman's strange behavior while recording a reel in a metro has gone viral. She suddenly starts laughing strangely and running around, leaving viewers puzzled. The video has attracted significant attention and online criticism for her unusual actions.
Web Summary : मेट्रो में रील बनाते समय एक महिला का अजीब व्यवहार वायरल हो गया। वह अचानक अजीब तरह से हंसने और इधर-उधर भागने लगती है, जिससे दर्शक हैरान हैं। वीडियो को काफ़ी ध्यान मिला है और उसकी असामान्य हरकतों के लिए ऑनलाइन आलोचना हो रही है।