मेट्रोत प्रेमी युगुलाला आली रोमान्सची 'लहर', वृद्ध महिला संतापली; जोडप्यासह बघ्यांनाही सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2023 14:59 IST2023-09-08T14:59:07+5:302023-09-08T14:59:59+5:30

हे सोशल मीडियाचं युग आहे, इथे कधी कोणती गोष्ट व्हायरल होईल याची कल्पना देखील केली जाऊ शकत नाही.

A video of an old woman getting angry at a couple having a romance in the metro in Delhi is going viral on social media  | मेट्रोत प्रेमी युगुलाला आली रोमान्सची 'लहर', वृद्ध महिला संतापली; जोडप्यासह बघ्यांनाही सुनावलं

मेट्रोत प्रेमी युगुलाला आली रोमान्सची 'लहर', वृद्ध महिला संतापली; जोडप्यासह बघ्यांनाही सुनावलं

viral video : हे सोशल मीडियाचं युग आहे, इथे कधी कोणती गोष्ट व्हायरल होईल याची कल्पना देखील केली जाऊ शकत नाही. प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी तरूणाई भन्नाट व्हिडीओ करून नेटकऱ्यांचं लक्ष वेधत असते. सोशल मीडियावरील फॉलोअर्संना आकर्षित करण्यासाठी कोण कोणत्या थराला जाईल याबद्दल न बोललेच बरं. यातून सार्वजनिक ठिकाणं देखील बाजूला राहिली नाहीत. मेट्रो, रेल्वे स्थानक येथील काही ना काही विचित्र घटना समोर येत असतात. अशातच दिल्ली मेट्रोतील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला. 

दिल्ली मेट्रोत प्रेमी युगुलांचा वाढता वावर आणि त्यांचे अशोभनीय कृत्य वारंवार समोर येत आहे. दिल्ली मेट्रो प्रशासनाने इशारा दिल्यानंतरही हे सगळे प्रकार सुरुच असल्याचे पाहायला मिळतात. आता दिल्ली मेट्रोतील नव्या भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हे भांडण एक महिला आणि प्रेमी युगुलामध्ये झाल्याचे दिसते. सार्वजनिक ठिकाणी या जोडप्याने अश्लील कृत्य केल्याने महिला संतापली अन् तिने सर्वांसमोर या प्रेमी युगुलाचा समाचार घेतला. 

मेट्रोत प्रेमी युगुलाला रोमान्सची 'लहर'
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत पाहायला मिळते की, मेट्रोच्या डब्यात खूप गर्दी असून खूप प्रवासी उभे आहेत. अशातच तिथे उभे असलेल्या एका प्रेमी युगुलाने एकमेकांच्या गालावर चिमटे काढताच वृद्ध महिला संतापली. जोडप्याचं कृत्य पाहताच महिलेला राग अनावर झाला अन् तिनं त्यांना सुनावलं. "तुझं काय चाललंय,  कधी त्याच्या केसांना हात लावतेस, कधी गालाला गोंजरतेस... लोक पण अशीच आहेत कोणीच काही बोलत नाही", असे संबंधित महिलेने मुलीला सुनावताना म्हटले. खरं तर मुलीनं देखील महिलेला प्रत्युत्तर दिलं. 'तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे', असं मुलीनं म्हणताच महिलेने म्हटले, "मी सांगते ना... हे चांगलं वाटत नाही. रोमान्स करायचा असेल तर बाहेर जाऊन कर." महिलेचा राग पाहता इतर प्रवाशांनी देखील प्रेमी युगुलाला सुनावलं. 

Web Title: A video of an old woman getting angry at a couple having a romance in the metro in Delhi is going viral on social media