'हा बेबी मी...'; बॉयफ्रेंडचा कॉल समजून ती वडिलांशी बोलली; फोनवर आवाज ऐकताच झोप उडाली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2023 13:06 IST2023-01-30T12:54:53+5:302023-01-30T13:06:21+5:30
एका तरुणीचा फोनवर बोसतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

'हा बेबी मी...'; बॉयफ्रेंडचा कॉल समजून ती वडिलांशी बोलली; फोनवर आवाज ऐकताच झोप उडाली!
सोशल मीडियावर दिवसेंदिवस अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. नेटकऱ्यांनीही या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात पसंती दिली आहे.
सदर व्हिडिओमध्ये एक तरुणी गाढ झोपेत झोपलेली असते. तितक्यात तिच्या मोबाईलवर एक कॉल येतो. एक तरुणी तिचा मोबाईल घेऊन येत आणि म्हणते हा घे तुझ्या बॉयफ्रेंडचा फोन आला आहे. यानंतर सदर तरुणी कॉल उचलते आणि ''हा बेबी मी नंतर बोलते. मी आता झोपली आहे. बाय. लव्ह यू'', असं बोलते. मात्र हा कॉल बॉयफ्रेंडचा नसतो, तर तिच्या वडीलांचा असतो.
सदर प्रकार तरुणीच्या लक्षात येताच ती घाबरुन जाते. बॉयफ्रेंड समजून तिने पप्पांना काय बोलून बसले, असा विचार ती करुन लागते. पुढे ती म्हणते 'पप्पा सॉरी सॉरी सॉरी, नाही पप्पा चुकून निघालं असं, म्हणत असल्याचे सदर व्हिडिओमधून दिसून येत आहे.
सदर व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. हा व्हिडीओ @butterfly_mahi इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ कुठला आहे ती कोण आहे याबद्दल काही माहिती मिळाली नाही. मात्र मजेदार व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत.