जुन्या स्कूटरला अनोखा निरोप! विकण्याची हिंमत झाली नाही, म्हणून घेतला हा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 10:05 IST2025-07-24T10:02:18+5:302025-07-24T10:05:41+5:30

गुजरातचे लोकगायक जिग्नेश कविराज यांनी त्यांच्या जुन्या स्कूटरला एक अनोखा निरोप दिला. मेहसाणा जिल्ह्यातील खेरालु गावात त्यांच्या घरासमोर स्कूटर पुरण्यात आली.

A unique farewell to an old scooter! I didn't have the courage to sell it, so I took this decision | जुन्या स्कूटरला अनोखा निरोप! विकण्याची हिंमत झाली नाही, म्हणून घेतला हा निर्णय

जुन्या स्कूटरला अनोखा निरोप! विकण्याची हिंमत झाली नाही, म्हणून घेतला हा निर्णय

आपण आयुष्यात पहिल्यांदा खरेदी केलेल्या वस्तुवर आपले जास्त प्रेम असते. ती वस्तू कितीही जुनी झाली तरीही आपण ती वस्तू विकत नाही, किंवा भंगारामध्ये देत नाही. ती वस्तु आपल्या घरामध्ये पडून राहते पण आपण कोणाला देत नाही. सहसा आपल्याकडे पहिली घेतलेली गाडी विकण्याची इच्छा होत नाही. अशीच एक घटना गुजरातमधून आली, येथील एका गायकाने आपली पहिली बाईक विकली नाही तर त्या बाईकचे आपल्या घरासमोर स्मारक करण्याचा निर्णय घेतला. 

चीनच्या 'मच्छर'नंतर आता 'झुरळ' बनणार युद्धभूमीतलं नवं शस्त्र; 'या' देशानं बनवला खतरनाक प्लॅन

गुजरातचे प्रसिद्ध लोकगायक जिग्नेश कविराज यांच्या कुटुंबाने त्यांच्या जुन्या स्कूटरला भंगारात देण्याऐवजी किंवा दुसऱ्याला विकण्याऐवजी एक अनोखा निरोप दिला आहे. खरं तर, त्यांच्या लाडक्या स्कूटरला मेहसाणा जिल्ह्यातील खेराळू गावात जिग्नेश कविराज यांच्या घरासमोर पुरण्यात आले आहे. 

'माझ्या कारकिर्दीत स्कूटरचे महत्त्वाचे स्थान'

जिग्नेश कविराज यांनी स्वतः त्यांच्या फेसबुक पेजवर पोस्ट करून ही माहिती दिली आहे. यासोबतच त्यांनी काही फोटोही शेअर केले आहेत.

"माझ्या कारकिर्दीतील पहिली कामगिरी म्हणजे माझ्या वडिलांची स्कूटर. माझ्या सुरुवातीच्या काळात माझे वडील कार्यक्रमांसाठी या स्कूटरवरून गावोगावी जायचे. आठवण म्हणून, आज आम्ही आमच्या खेराळू गावात आमच्या घरासमोरील स्मारकात स्कूटरचे दफन केले आहे, अशी माहिती लोकगायक जिग्नेश यांनी त्यांच्या पोस्टमध्ये दिली. 

यासोबतच एक व्हिडिओही पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये जिग्नेश कविराजचे कुटुंबीय बजाज स्कूटरला कुंकूचा टिळक लावत आहेत, त्यावर फुलांचा हार घालत आहेत आणि नंतर घरासमोर खोदलेल्या खड्ड्यात ते बाईक गाडत असल्याचे दिसतंय.

Web Title: A unique farewell to an old scooter! I didn't have the courage to sell it, so I took this decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.