धक्कादायक! लोकोपायलटच्या जाग्यावर तिसराच व्यक्ती बसला, मोठा गोंधळ उडाला, अनेकांचा जीव धोक्यात; व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 16:17 IST2025-08-12T16:05:39+5:302025-08-12T16:17:42+5:30
मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर रेल्वे स्टेशनवर, एका वेड्या व्यक्तीने ट्रेनच्या इंजिनमध्ये प्रवेश केला, यावेळी तो लोको पायलटच्या सीटवर बसला.

धक्कादायक! लोकोपायलटच्या जाग्यावर तिसराच व्यक्ती बसला, मोठा गोंधळ उडाला, अनेकांचा जीव धोक्यात; व्हिडीओ व्हायरल
रेल्वेचे इंजिन एक महत्वाचा पार्ट असतो. यामध्ये जबाबदारीचे लोकोपायलट बसलेले असतात. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर रेल्वे स्थानकारुन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोमवारी एका वेगळ्याच व्यक्तीने ट्रेनच्या इंजिनमध्ये प्रवेश केला. यावेळी लोको पायलटच्या सीटवर बसून त्याने आज मी आज ट्रेन चालवेन, असं म्हणाला.' यामुळे मोठा गोंधळ उडाला, या घटनेमुळे रेल्वेला अर्धा तास उशीर झाला. या एका व्यक्तीमुळे अनेकांचा जीव धोक्यात आला होता.
ग्वाल्हेरहून मुरेना येथील सुमावली-सबलगडला जाणारी मेमू ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर निघण्यासाठी तयार होती. अचानक एक व्यक्ती इंजिन केबिनमध्ये घुसला आणि लोको पायलटच्या सीटवर बसला. त्याने फक्त सीटच घेतली नाही तर लोको पायलटला सांगितले, "मी आज ट्रेन चालवेन" लोको पायलटने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, पण तो व्यक्ती ट्रेन चालवण्यावर ठाम होता. यादरम्यान, एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
प्रवाशांमध्ये घबराट
इंजिनमध्ये एक अज्ञात व्यक्ती बसल्याचे प्रवाशांना कळताच, ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांमध्ये घबराट पसरली. काही प्रवासी घाबरून ट्रेनमधून खाली उतरले. लोको पायलटने हुशारी दाखवली आणि ताबडतोब नियंत्रण कक्षाला माहिती दिली. रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी आणि रेल्वे संरक्षण दल (आरपीएफ) यांचे पथक घटनास्थळी पोहोचले. सुमारे १० मिनिटांच्या प्रयत्नांनंतर,त्या व्यक्तीला समजावून इंजिनमधून बाहेर काढण्यात आले. या दरम्यान, ट्रेन थांबवण्यात आली, यामुळे ती ट्रेन अर्धा तास उशिरा निघाली. आरपीएफने तरुणाला ताब्यात घेतले आणि त्याच्या मानसिक स्थितीची चौकशी सुरू केली.
व्हिडीओ व्हायरल
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यामध्ये तरुण लोको पायलटशी वाद घालताना आणि सीटला चिकटून बसताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये लोको पायलट त्याला शांत करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. हा व्हिडीओ केवळ लोकांसाठी चर्चेचा विषय बनला नाही तर रेल्वेच्या सुरक्षा व्यवस्थेवरही वाद निर्माण झाला.