रस्त्यावर गजरे विकणाऱ्या मुलाला अनोळखी व्यक्तीने दिलं सरप्राईज, डोळ्यात तरळले आनंदाश्रू!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 16:16 IST2024-12-13T15:48:13+5:302024-12-13T16:16:20+5:30
Emotional Video : एक अनोळखी व्यक्ती एका छोट्या मुलाला एक सरप्राइज देते, ज्यानंतर त्याच्या आनंदाला सीमा नसते. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून बघून लोक इमोशनल होत आहेत.

रस्त्यावर गजरे विकणाऱ्या मुलाला अनोळखी व्यक्तीने दिलं सरप्राईज, डोळ्यात तरळले आनंदाश्रू!
Emotional Video : गरीब असो वा श्रीमंत प्रत्येकांसाठी छोट्या छोट्या गोष्टींमधील आनंद खूप महत्वाचा असतो. अनेकदा तर आपल्याला अशा गोष्टींमधून आनंद मिळतो, ज्याची आपण कल्पनाही केलेली नसते. सोशल मीडियावर हेच दाखवणारा एक सुंदर व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात एक अनोळखी व्यक्ती एका छोट्या मुलाला एक सरप्राइज देते, ज्यानंतर त्याच्या आनंदाला सीमा नसते. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून बघून लोक इमोशनल होत आहेत.
व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, एक छोटा मुलगा रस्त्याच्या कडेला बसून गजरे विकत आहे. अशात एक व्यक्ती या मुलाकडे गजरा खरेदी करण्यासाठी येते. मुलाकडून गजरा घेऊन ही व्यक्ती त्याला गजऱ्याच्या किमतीपेक्षा खूपसारे पैसे देते. इतकंच नाही तर व्यक्ती मुलाला खाण्या-पिण्याच्या गोष्टीही देते. हे सगळं बघून त्याला खूप आनंद होतो. नंतर हा मुलगा आनंदाने सगळं काही आपल्या आईला सांगतो. त्याची आईच्या चेहऱ्यावरही हसू फुलतं. हे सगळं दृश्य बघून लोक भावूक झाले आहेत. व्हिडीओ बघण्यासाठी इथे क्लिक करा.
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर @iamhussainmansuri नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनला लिहिलं आहे की, 'कुणाच्या तरी आनंदाचं कारण बना'. या व्हिडिओला आतार्यंत ४६ लाखांपेक्षा जास्त लाइक्स आणि ४९ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. लोक या व्हिडिओवर वेगवेगळ्या इमोशनल प्रतिक्रियाही देत आहेत.