फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 19:09 IST2026-04-03T19:09:14+5:302026-04-03T19:09:43+5:30

ताजमहाल पाहिल्यानंतर न्यूयॉर्कच्या या क्रिएटरने जेवणाच्या शोधात ई रिक्षा घेतली आणि नॉर्थ इंडियन ट्रेडिशनल फूडचा आस्वाद घेत फ्लाईटच्या आधी काही वेळ घालवला

A social media content creator from America came to India for just one day; left after seeing the Taj Mahal, video goes viral | फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल

फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल

नवी दिल्ली - सोशल मीडियावर एका कन्टेंट क्रिएटरचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. न्यूयॉर्कमधून आलेला हा युवक १५ तासांचा विमान प्रवास करून केवळ एक दिवसासाठी भारतात आला होता. या युवकाला फक्त ताजमहाल पाहायचे होते. एका दिवसात तो दिल्ली-आग्रा फिरला आणि ताजमहाल पाहून निघून गेला. 

न्यूयॉर्क येथील एका कन्टेंट क्रिएटरने भारताची एक दिवसाची सफर केली आणि ताजमहालला भेट दिली. केविन ड्रोनियाक असं या युवकाचं नाव आहे. केविन म्हणाला की, २४ तासांच्या प्रवासासाठी एका बाजूने १५ तासांचा प्रवास करायला फार कमी लोक तयार होतील . परंतु हा किस्सा त्या कन्टेंट क्रिएटरसाठी हैराण करणारा नव्हता. कारण त्याचं वैशिष्ट एका दिवसाच्या सुट्टीत जगभर फिरण्यासाठी तो ओळखला जातो. 

भारतातील एक दिवस

केविनचा भारत दौरा न्यूयॉर्क शहरातून नवी दिल्लीसाठी १५ तासांच्या विमान प्रवासाने सुरू झाला. २१ मार्चला रात्री ९.३० वाजता तो दिल्लीत उतरला. एअरपोर्टवर इम्रीगेशन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्याने आग्रासाठी एक टॅक्सी बूक केली. दिल्ली ते आग्रा प्रवासासाठी त्याला ४ तास लागले. रात्री २ च्या सुमारास तो आग्रा शहरात पोहचला. हॉटेलमध्ये काही तास आराम केल्यानंतर हा अमेरिकन कन्टेंट क्रिएटर ताजमहाल पाहण्यासाठी सकाळी लवकर उठला. त्याने इन्स्टाग्राम व्हिडिओत ताजमहाल  फिरताना दाखवलं आहे. 


ताजमहाल पाहिल्यानंतर न्यूयॉर्कच्या या क्रिएटरने जेवणाच्या शोधात ई रिक्षा घेतली आणि नॉर्थ इंडियन ट्रेडिशनल फूडचा आस्वाद घेत फ्लाईटच्या आधी काही वेळ घालवला. त्यानंतर केविन बेबी ताज पाहण्यासाठी गेला. अखेर दिवस मावळत असताना त्याने दिल्लीला जाणारी ट्रेन पकडली. मात्र स्टेशनला पोहचताच त्याची ट्रेन रद्द झाली होती. अमेरिकेला परत जाणारी फ्लाईट सुटू नये यासाठी केविनने पुन्हा टॅक्सी बूक करत दिल्लीला गेला. तिथून दिल्ली एअरपोर्टवरून तो त्याच्या मायदेशी गेला. केविनच्या या व्हिडिओला अनेकांनी लाईक्स केले आहे आणि प्रतिक्रिया दिल्या आहेत.  

Web Title : अमेरिकी युवक एक दिन के लिए भारत, ताजमहल देखकर वीडियो वायरल।

Web Summary : न्यूयॉर्क के कंटेंट क्रिएटर केविन ताजमहल देखने भारत आए। दिल्ली से आगरा गए, ताज देखा, स्थानीय भोजन का आनंद लिया, और ट्रेन रद्द होने पर फ्लाइट पकड़ने के लिए दिल्ली वापस चले गए। उनका वीडियो वायरल हो रहा है।

Web Title : American tourist visits Taj Mahal for a day, video goes viral.

Web Summary : A New York content creator, Kevin, traveled to India for a day to see the Taj Mahal. He flew to Delhi, drove to Agra, saw the Taj, enjoyed local food, and then rushed back to Delhi to catch his flight home after his train was cancelled.