शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
3
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
4
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
5
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
6
अभिमानास्पद! वडिलांची मित्रांनी उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवते फुटबॉलचं मैदान
7
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
8
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
9
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
10
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...
11
लाडक्या बहिणींच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांचं आता काही खरं नाही, पुढील १५ दिवसांत...
12
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
13
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेले मुख्यालय पुन्हा बांधण्यासाठी जैशचा प्रमुख पुन्हा सक्रिय; मसूद अझहरने अनेकांकडे देणग्या मागितल्या
14
नवजात लेकीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं पण 'त्याने' जीवदान दिलं, शरीराला लागलेले किडे
15
RBI च्या निर्णयानंतर गुंतवणूकदारांना झटका! विप्रोसह 'या' क्षेत्रात मोठी घसरण, कुठे झाली वाढ?
16
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान
17
लग्नाचं निमंत्रण दिलं नाही, सहकाऱ्यांनी एचआरकडे केली तरुणीची तक्रार, त्यानंतर घडलं असं काही...
18
"कित्येकांनी बलिदान दिले, शिरांचे ढीग लागले, पण धर्म सोडला नाही"- मोहन भागवत
19
"डोकं फिरवू नका, मी मंत्री, तुम्ही मलाच न सांगता...", PWD अधिकाऱ्यावर संतापले दयाशंकर सिंह
20
जगाला आपल्या धाकात ठेऊ पाहणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची संपत्ती किती? उत्पन्नाचा खरा स्रोत कोणता?

Gujarat Shopkeeper Discount:दुकानदाराने जिंकली मने! १५ ऑगस्टच्या पूर्वसंध्येला जवानांना दिली अप्रतिम ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2022 14:08 IST

१५ ऑगस्ट २०२२ रोजी देश आपला ७५ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे.

नवी दिल्ली : १५ ऑगस्ट २०२२ रोजी देश आपला ७५ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होत असून त्यानिमित्ताने देशभर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. भारत सरकारकडून 'हर घर तिरंगा' (Har Ghar Tiranga) या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले जात आहे. या मोहिमेअंतर्गत देशभरातील नागरिक सोशल मीडियावर तिरंग्याचा फोटो आपल्या प्रोफाईल फोटोवर ठेवत आहेत. दरम्यान, गुजरातमधील एका दुकानदाराने भारतीय सैन्यातील जवानांना एक अप्रतिम ऑफर देऊन सर्वांची मने जिंकली आहेत. दुकानातील कोणतीही वस्तू खरेदी केल्यावर सैनिकांना ५० टक्के सवलत दिली जाईल, असे दुकानदाराने जाहीर केले आहे. 

'हर घर तिरंगा' मोहिमेमुळे मिळाली प्रेरणाभारतीय जवानांना खास ऑफर देणारे दुकान गुजरातमधील सुरत येथील आहे. दुकानदारांचे म्हणणे आहे की, पंतप्रधान मोदींनी केलेल्या 'हर घर तिरंगा' या मोहिमेत मी सहभागी झालो असून आमचे दुकान तिरंग्याने भरले आहे. यातूमच मला प्रेरणा मिळाली आणि स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणखी रंगतदार व्हावा यासाठी आम्ही ही ऑफर देण्याचे ठरवले आहे, असे त्याने अधिक म्हटले. 

जवानांसाठी ५० टक्के सवलतया दुकानात कोणीही जवान आला तर त्याला मिठाईवर ५० टक्के सूट दिली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. ही ऑफर आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्समध्ये कार्यरत असलेल्या जवानांना असणार आहे. लक्षणीय बाब म्हणजे निवृत्त झालेले जवान देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात. आपल्या सर्व शूर सैनिकांसाठी ही योजना लागू करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. 

देशभर स्वातंत्र्याच्या अमृतोत्सवाचा जल्लोषभारत सरकारकडून स्वातंत्र्याची ७५ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल देशभर अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. या महोत्सवानिमित्त सरकारकडून 'हर घर तिरंगा' मोहिम राबवली जात आहे. देशभरातील विविध क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी आपल्या प्रोफाईलवर तिरंगा लावून या अमृत महोत्सवात सहभाग नोंदवला आहे. 

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाIndependence Dayस्वातंत्र्य दिनGujaratगुजरातSuratसूरतIndiaभारतIndian Armyभारतीय जवान