नाल्यासाठी खड्डा खोदला अन् नशिबच उघडलं! सोन्याचे नाणे सापडले, गावकऱ्यांना कळताच लागली रांग
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 16:35 IST2025-07-25T16:19:52+5:302025-07-25T16:35:59+5:30
नाला खोदण्यास सुरुवात केल्यानंतर सोन्याचे नाणे सापडण्यास सुरूवात झाली.

नाल्यासाठी खड्डा खोदला अन् नशिबच उघडलं! सोन्याचे नाणे सापडले, गावकऱ्यांना कळताच लागली रांग
उत्तर प्रदेशमध्ये अलिगड जिल्ह्यातील एका गावात ड्रेनेजची पाईटपलाईन काढण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यामध्ये ११ सोन्याची नाणी सापडली आहेत. यामुळे संपूर्ण गावात मोठा गोंधळ उडाला आहे.हे पाण्यासाठी आणि नाणे घेण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. नंतर पोलिसांनी काही नाणी जप्त करून सील केली.
ही घटना दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली. गावातील स्थानिक रहिवासी पाण्याचा निचरा करण्यासाठी पाईपलाईन टाकण्याचे काम करत होते. गावकऱ्यांनी देणग्या गोळा केल्या आणि खोदकाम सुरू केले. यावेळी अचानक, खोदकाम करताना, मातीखालून चमकदार धातूच्या वस्तू बाहेर आल्या, ते सोन्याची नाणे असल्याचा दावा सुरू आहे.
हैदराबादमध्ये शंभर वर्षे जुने मंदिर पाडण्यावरुन मोठा वाद; माधवी लतांना पोलिसांनी घेतले ताब्यात
गावकऱ्यांनी दिलेली माहिती अशी, आम्ही पाच-सहा कुटुंबांनी मिळून पाईप टाकण्यासाठी नाला बांधण्यासाठी पैसे गोळा केले होते. जेव्हा आम्ही कोरडी माती भरण्यासाठी खड्डा खोदला तेव्हा आम्हाला नाणी दिसली. सुरुवातीला आम्हाला ११ नाणी सापडली, पण नंतर खोदकाम सुरू असताना लोकांना आणखी नाणी सापडली.
"ज्यांनी नाणी पाहिली त्यांनी आणखी नाणी मिळवण्यासाठी खोदकाम वाढवले. काहींनी हातांनी खोदकाम सुरू केले, तर काहींनी बांबू आणि फावड्यासह खोदकाम सुरू केले.
पोलिसांनी सर्व जप्त केले
उत्खननादरम्यान सोन्याचे नाणी सापडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. स्थानिक पोलिस स्टेशन क्वार्सीचे एसएचओ यांना माहिती मिळताच ते त्यांच्या पथकासह घटनास्थळी पोहोचले.
पोलिस येताच काही लोकांनी त्यांना सापडलेली नाणी पोलिसांकडे सोपवली. अकरा नाणीही पोलिस ठाण्यात जमा करण्यात आली. परंतु गावात अशी चर्चा आहे की काही लोकांकडे अजूनही अनेक नाणी आहेत. पोलिसांसोबत आलेल्या अधिकाऱ्यांनी नंतर संपूर्ण परिसराला घेराव घातला आणि जे काही सापडले ते जप्त करून सील केले. चांदीचे नाणे, अँटीमोनी मणी आणि २५० ग्रॅम धातूची वीट यासारख्या वस्तू देखील जप्त करण्यात आल्या आहेत.