चांगलं करण्याच्या नादात मरता मरता वाचली व्यक्ती, बैलानं टक्कर मारत उडवलं हवेत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 12:38 IST2025-02-06T12:36:55+5:302025-02-06T12:38:00+5:30
Viral Video : कधी डान्सचे रील्स, कधी स्टंटचे तर कधी अपघाताचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण सध्या एक वेगळाच व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

चांगलं करण्याच्या नादात मरता मरता वाचली व्यक्ती, बैलानं टक्कर मारत उडवलं हवेत!
Viral Video : आजकाल लोक सोशल मीडियाचा खूप जास्त वापर करत आहेत. तरूण लोक सोशल मीडियावर अधिक अॅक्टिव राहतात आणि वेगवेगळ्या गोष्टी पोस्ट करत असतात. वेगवेगळ्या प्रकारचे रील्स नेहमीच व्हायरल होत असतात. कधी डान्सचे रील्स, कधी स्टंटचे तर कधी अपघाताचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण सध्या एक वेगळाच व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
व्हिडिओत बघू शकता की, एक नदी किनारी एक बैल उभा आहे. ज्याच्या शिंगामध्ये एक धागा अडकला आहे. एका व्यक्तीला हे दिसतं आणि तो बैलाची मदत करण्यासाठी समोर येते. तो आरामात बैलाच्या शिंगांमध्ये अडकलेला धागा काढतो. पण असं केल्यावर बैल संतापतो आणि व्यक्तीवर हल्ला करतो. काही सेकंदानं बैल शिंगानं वार करतो, ज्यामुळे व्यक्ती पाण्यात पडते. हा व्हिडीओ या गोष्टीमुळे खास आहे, कारण कधी कधी मदत करणंही महागात पडू शकतं.
Mere saath toh glt hi ho jaata hai 😭 pic.twitter.com/2vMqzmZVn8
— Dude (@Memes4Grind) February 4, 2025
हा व्हिडीओ एक्स प्लॅटफॉर्मवर @Memes4Grind नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओसोबत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'माझ्यासोबत नेहमीच चुकीचं होतं'. या व्हिडीओला आतापर्यंत १८ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही देत आहेत.
व्हिडिओवर एका यूजरनं लिहिलं की, 'जास्त चांगलं करणंही योग्य नाही'. तर दुसऱ्यानं लिहिलं की, 'तोडलं मला भाऊ'. तिसऱ्यानं लिहिलं की, 'कधी कधी चांगलं करणंही असं महागात पडतं'.