महिला डॉक्टरचा सफाई कर्मचाऱ्यावर जीव जडला; स्वत:हून प्रपोज करत थेट लग्नच केले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2022 17:31 IST2022-09-08T17:30:52+5:302022-09-08T17:31:27+5:30

शहजाद आणि किश्वर साहिबा या दोघांची लव्हस्टोरी सगळीकडे चर्चेचा विषय बनली आहे

A Pakistani woman doctor was Proposed to sanitation worker and got married directly | महिला डॉक्टरचा सफाई कर्मचाऱ्यावर जीव जडला; स्वत:हून प्रपोज करत थेट लग्नच केले

महिला डॉक्टरचा सफाई कर्मचाऱ्यावर जीव जडला; स्वत:हून प्रपोज करत थेट लग्नच केले

प्रेमात जातपात, गरीब श्रीमंत, वय हे काहीच दिसत नाही. प्रेम कधीही, कुणालाही आणि कुणाशीही होऊ शकते. याचेच एक उदाहण पाकिस्तानात पाहायला मिळत आहे. ज्याची चर्चा सध्या देशभरात सुरू आहे. याठिकाणी एका महिला डॉक्टरचा सफाई कर्मचाऱ्यावर जीव जडला. तिनेच त्याला प्रपोज केले त्यानंतर या दोघांनी लग्नही केले. पाकिस्तानच्या ओकारा जिल्ह्यातील दीपालपुर येथील हे जोडपे राहायला आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार, या सफाई कर्मचाऱ्याचं नाव शहजाद असं आहे. तर महिला डॉक्टरचं नाव किश्वर साहिबा असं आहे. दोघांनी एक यूट्यूब चॅनेलही बनवला आहे. ज्याच नाव किश्वर विलेज व्लॉग असं आहे. या चॅनेलवर विविध प्रकारचे व्हिडिओ बनवून शेअर केले जातात. सफाई कर्मचाऱ्यासोबत डॉक्टर महिलेने लग्न केल्यानंतर मेरे पाकिस्तान नावाच्या यूट्यूब चॅनेलने त्यांची मुलाखत घेतली. 

या मुलाखतीत शहजादनं सांगितले की, माझ्या आयुष्यात एक डॉक्टर लाईफ पार्टनर म्हणून येईल असा मी कधीही विचार केला नव्हता. तर शहजादची पर्सनॅलिटी खूप आवडत होती. तो नेहमी नजर खाली करून माझ्याशी बोलत होता. शहजादला पाहून वाटलं नव्हतं तो सफाई कामगार असेल अथवा चहा बनवणारा असेल. शहजादचा स्वभावही मला भावला. त्यामुळे शहजादसोबत निकाह करण्याचा मी निर्णय घेतला असं महिला डॉक्टर किश्वर साहिबा यांनी म्हटलं. 

महिला डॉक्टरनेच केला प्रपोज
शहजाद आणि किश्वर साहिबा या दोघांची लव्हस्टोरी सगळीकडे चर्चेचा विषय बनली आहे. शहजाद सांगतो की, डॉक्टर साहिबा माझ्याशी बोलण्यासाठी उत्सुक असतात याचा अंदाजही मला नव्हता. डॉक्टर किश्वराने माझा नंबर मागितला. तो नंबर त्यांनी सेव्ह करून घेतला. एकेदिवशी स्वत: त्यांनी प्रेमाची कबुली दिली. त्यानंतर आम्ही दोघं सुरुवातीला एकमेकांना भेटत होतो. काही दिवसांनी आम्ही लग्न केले. लग्नानंतर अनेकांनी किश्वर साहिबा डॉक्टरला टोमणे मारण्यास सुरुवात केली. लोकांची बोलणी ऐकून किश्वराने नोकरी सोडून स्वत:चं क्लिनिक उघडण्याचा निर्णय घेतला. सध्या हे दोघं आनंदाने जीवन जगत आहेत. 
 

Web Title: A Pakistani woman doctor was Proposed to sanitation worker and got married directly